
Amazon Now in Mumbai : ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अमेझॉनने (Amazon) आपली अत्यंत वेगवान 'अमेझॉन नाऊ' (Amazon Now) ही 10-मिनिटांची डिलिव्हरी सेवा आता मुंबईतील (Mumbai) काही भागांमध्ये सुरू केली आहे. यापूर्वी ही सेवा बंगळूरू आणि दिल्लीमध्ये यशस्वीरित्या सुरू करण्यात आली होती.
काय आहे Amazon Now ?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या 10 मिनिटांच्या डिलिव्हरी सेवेसाठी अमेझॉनने तीन शहरांमध्ये 100 पेक्षा जास्त मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स (लहान वितरण केंद्र) सुरू केली आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत अशी आणखी शेकडो केंद्रे सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि प्रादेशिक व्यवस्थापक समीर कुमार यांनी सांगितले की, "आम्ही या वर्षीच्या सुरुवातीला बंगळूरूमध्ये 'अमेझॉन नाऊ' ही 10 मिनिटांची अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरी सेवा सुरू केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूपच चांगला आहे. या सेवेतील दैनंदिन ऑर्डर्समध्ये दर महिन्याला 25% दराने वाढ होत आहे."
( नक्की वाचा : MHADA News : सर्वात मोठी पुनर्विकास योजना; गोरेगावच्या रहिवाशांना ‘जॅकपॉट' लागला; 1600 चौरस फूट घर मिळणार )
या सेवेच्या यशाने उत्साहित होऊनच कंपनीने बंगळूरू, दिल्ली आणि मुंबईमध्ये 100 हून अधिक लहान वितरण केंद्रे सुरू केली आहेत. तसेच, येत्या काळात आणखी शेकडो केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. सध्या ही सेवा काही निवडक पिन कोडमध्ये उपलब्ध आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये इतर शहरांमध्येही ती सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world