गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg Malvan Dandi Beach : वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी मालवण दांडी समुद्रात उतरलेल्या एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. शीतल शशिकांत मठकर (45)असं मृत महिलेचं नाव आहे. शीतल अंबरनाथ येथील रहिवासी होती.अंबरनाथ येथील मठकर कुटुंबीय पर्यटनासाठी मालवण येथे आले होते.वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटल्यानंतर शीतलची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला समुद्रा बाहेर काढण्यात आले.शीतलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
एका डॉक्टरने शीतलवर प्राथमिक उपचार केले, पण..
मिळालेल्या माहितीनुसार,मालवणच्या दांडी किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्ससाठी मठकर कुटुंबीय समुद्राच्या पाण्यात उतरले.त्यानंतर शीतलची तब्येत बिघडली. एका डॉक्टरने शीतलवर प्राथमिक उपचार सुरु केले.परंतु,शीतल कोणताही प्रतिसाद देत नसल्याने तिला मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र,उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
नक्की वाचा >> Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर, रेल्वेमार्ग झाले फायनल, महाराष्ट्रात कोणते स्टेशन?
कुटुंबीयांचा ग्रामीण रुग्णालयात आक्रोश
मठकर यांना स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात मतद केली. मठकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला.स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी त्यांना धीर दिला.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जनार्दन रेवंडकर करत आहेत.
नक्की वाचा >> Palghar News : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर 12 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world