जाहिरात

Ind vs IRE : वैभव सूर्यवंशीला प्लेईंग XI मधून बाहेर ठेवलं, चाहते भडकले, गंभीर विरोधात मिम्सचा पाऊस

नाणेफेकी दरम्यान भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने वैभवबाबत माहिती दिली की, तो या सामन्यात खेळत नाहीय. त्यानंतर वैभवच्या चाहत्यांचा एका मोठ्या वर्गात नाराजीचा सूर पसरला.

Ind vs IRE : वैभव सूर्यवंशीला प्लेईंग XI मधून बाहेर ठेवलं, चाहते भडकले, गंभीर विरोधात मिम्सचा पाऊस
Ind vs Ire, Vaibhav Sooryavanshi News

Vaibhav Sooryavanshi latest News :  भारत विरुद्ध आर्यलँड यांच्यातील पहिला टी-20 सामना बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये रंगण्याआधीच वैभव सूर्यवंशीची जोरदार चर्चा होती. प्रत्येक जण वैभवच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाबाबत चर्चा करत होता. वेभवला सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडण्याची मोठी संधी असल्याने वैभवच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

परंतु, नाणेफेकी दरम्यान भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने वैभवबाबत माहिती दिली की, तो या सामन्यात खेळत नाहीय. त्यानंतर वैभवच्या चाहत्यांचा एका मोठ्या वर्गात नाराजीचा सूर पसरला. सामन्याचा वेळ जसजसा पुढे गेला,त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा पारा चढला. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. 

नक्की वाचा >>Maharashtra Rain : महाराष्ट्रात 'या' तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस, जूनमध्ये पाऊस पडला कमी, कारण आलं समोर

प्रिंस यादवलाही प्लेईंग 11 मध्ये संधी नाही

वैभवच्या चाहत्यांनी गौतम गंभीर यांच्यावर टीका टिपण्णी करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या. वैभवला प्लेईंग इेलेव्हन मध्ये सामील न केल्याने चाहत्यांनी गंभीर यांच्यावर कशाप्रकारे राग काढला.

हे तुम्ही व्हायरल पोस्टमध्ये पाहू शकता. हे प्रकरण वैभव पुरतच मर्यादित नाही. तर संघात सामील केलेला युवा पेसर प्रिंस यादवलाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' हाय प्रोफाईल सोसायटीत रहिवाशांची उडाली धावपळ,अंगावर काटा आणणारी सातवी घटना, Video

वैभवला खेळवण्याबाबत माध्यमांचा मोठा दबाव होता. वैभवच्या पदार्पणाबाबत क्रिडा विश्वात विविध चर्चा रंगल्या होत्या.

परंतु,वैभवचं पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी गौतम गंभीरसह कर्णधार श्रेयस अय्यरवरही मिम्सचा पाऊस पाडला. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com