
अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोपाळ कृष्ण गोखले पूल आज 11 मेपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. गोखले पूल बंद झाल्यानंतर अडीच वर्षांनी हा पूल सार्वजनिक वापरासाठी सज्ज आहे. हा पूल बंद झाल्यानंतर याची चर्चा देशभरात झाली होती. या पुलासाठी तब्बस 90 कोटी खर्च करण्यात आला आहे.
अखेर रविवारी या पुलाचं लोकार्पण पार पडलं. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गोखले पूलावरुन पालिकेची उडवली होती खिल्ली...
गोखले पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडला जातो. हा पूल 1975 मध्ये तयार करण्यात आला होता. या पूलाचा काही भाग 3 जुलै, 2018 मध्ये कोसळला होता. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर 7 नोव्हेंबर 2022 मध्ये हा पूल सार्वजनिकरित्या बंद करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यानंतर पालिकेची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली. गोखले पुलाला आधी तयार असलेल्या फ्लायओव्हरशी जोडायचं होतं. मात्र दोन्हीमध्ये मिसअलायनमेंट झाल्यानंतर फ्लायओव्हर आणि गोखले पूल जोडूच शकला नाही.

फेब्रुवारी 2024 मध्ये गोखले पूल आणि फ्लायओव्हरमधील अलायनमेंट चुकली होती
नक्की वाचा - Mumbai Metro : मुंबईकरांसाठी Good News! मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू
नेमकं काय चुकलं?
गोखले पुलामुळे मुंबई महानगर पालिकेला टीकेचा सामना करावा लागला होता. गोखले पुलाला जुहूशी जोडणाऱ्या बर्फीवाला फ्लायओव्हरशी जोडायचं होतं. मात्र गोखले पुलाची उंची तब्बल दीड ते दोन मीटरने जास्त होती. त्यामुळे पुलाच्या डिझाइनवरुन सोशल मीडियावर लोकांनी खूप खिल्ली उडवली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world