रेवती हिंगवे, पुणे
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्माण घेतला आहे. पुणे शहर सुरक्षित करण्यासाठी शहरात आणखी 7 पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द हे लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, आणि काळेपडळ या पोलीस स्टेशनची स्थापना करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.