
गेला आठवडाभरापासून ओला उबेर चालकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ओला उबेर चालकांनी संप देखील पुकारला होता. परिवहन विभागाने या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. ओला उबेर चालकांच्या मागण्यांपैकी बाईक टॅक्सी धोरण रद्द करावं आणि ओला उबेर भाडं हे परिवहन विभागाच्या मीटरटॅक्सी भाडे धोरणाच्या नियमात बसवावं या दोन प्रमुख मागण्या होत्या.
यापैकी ओला उबेरचे भाडे हे मीटर टॅक्सी भाडे धोरणाप्रमाणे आकारण्यात येईल याबाबत परिवहन सह आयुक्त आणि ओला उबेर कंपन्या यांच्यात झालेल्या बैठकीत तत्वत: एक मत झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ओला उबेर टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. मीटरटॅक्सी भाडे धोरणानुसार प्रति किलोमीटर भाडं हे किमान 22 रुपये आणि कमाल भाडे हे 45 रुपयापर्यंत आकारले जाते. सध्या आपण बघितलं तर नॉनपीक अवरमध्ये म्हणजेच कामावर ये-जा करण्याच्या वेळा वगळता ओला उबेर टॅक्सी कडून 15 ते 16 रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारले जात होते.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
यातून कमिशन वगळून चालकाला आठ ते दहा रुपयेच मिळत होते. ज्या तासांमध्ये ओला उबेरची मागणी जास्त असायची त्यावेळी ओला उबेर कडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. ओला उबेर चालकांकडून जास्त कमिशन घेऊन नाममात्र पैसे दिले जात होते. मात्र आता ओला उबेर कंपन्यांना कमिशन म्हणून देखील एक ठराविक रक्कमच आकारता येईल. यासोबतच ओला उबेर चालकांना 45 रुपये प्रति किलोमीटर पेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.
ह्या निर्णयानुसार ओला उबेरची ज्या वेळी कमी मागणी असते त्यावेळी ओला उबेर वापरकर्त्यांना टॅक्सीप्रमाणे भाडे द्यावे लागेल. जे सध्याच्या तुलनेत जास्त असेल. याचा एक फायदा असाही होणार आहे की, ज्यावेळी ओला उबेर टॅक्सीची मागणी जास्त असते त्यावेळी ओला उबेर चालक मनमानी पद्धतीने 45 रुपये पेक्षा जास्त भाडे आकारू शकणार नाही. हेच भाडं ओला उबेर कंपन्यांकडून सुट्टीच्या दिवशी किंवा ओला उबेर टॅक्सीची मागणी जास्त असताना 60 ते 70 रुपये प्रति किलो मीटर प्रमाणे देखील आकारले जात होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world