जाहिरात

पत्नीशी झालेल्या भांडणाचा भयंकर परिणाम, नालासोपाऱ्याच्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

पत्नीशी भांडण झालं म्हणून एका 30 वर्षाच्या इसमाने थेट नालासोपारा रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे रुळावर झोपून स्वत:चाच जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पत्नीशी झालेल्या भांडणाचा भयंकर परिणाम, नालासोपाऱ्याच्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल
नालासोपारा:

प्रतिनिधी, मनोज सातवी 

8 जुलै रोजी नालासोपाऱ्यात (Nalasopara News) राहणाऱ्या पिता-पुत्राने आर्थिक अडचणीतून एकत्रितपणे आत्महत्या केली होती. त्या दोघांनी एकत्रितपणे लोकल ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिल्याचा एक व्हिडिओही समोर आला होता. या अंगावर आणणाऱ्या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकलखाली जीव देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आला आहे. 

पत्नीशी भांडण झालं म्हणून एका 30 वर्षाच्या इसमाने थेट नालासोपारा रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे रुळावर झोपून स्वत:चाच जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रेल्वे स्थानकातील इतर प्रवाशांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला. रेल्वे प्रवाशांनी तत्काळ धाव घेऊन त्या इसमाला रुळावरून प्लॅटफॉर्मवर आणले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याच्या पत्नीला बोलावून त्या दोघांचही समुपदेशन केले आणि घरी पाठवलं. रेल्वे प्रवाशांनी सतर्कता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. 

नक्की वाचा - साध्या वेशात पोलिसांनी नराधम दाऊदच्या आवळल्या मुसक्या; यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 8 जुलै रोजी नालासोपाऱ्यात राहणाऱ्या पिता-पुत्राने भाईंदर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली होती. हरीश मेहता आणि जय मेहता यांनी लोकल ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा रेल्वे रुळावर झोपून इसमाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने रेल्वे स्थानकामध्ये काही काळ गोंधळ उडाला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com