जाहिरात

Asha Bhosle Death : पुण्यात होतं आशा भोसलेंचं फेव्हरेट हॉटेल, 1997 पासून सहकुटुंब खायच्या मटणाची थाळी

आशा भोसले यांचं संगीतावर जितकं प्रेम होतं तितकचं त्या खवय्याही होत्या. 1997 पासून सिंहगड रस्त्यावरील हॉटेल शेतकरी येथे सहकुटुंब मटण थाळीचा आस्वाद घेण्यासाठी त्या यायच्या.

Asha Bhosle Death : पुण्यात होतं आशा भोसलेंचं फेव्हरेट हॉटेल, 1997 पासून सहकुटुंब खायच्या मटणाची थाळी
Asha Bhosle Favorite Hotel In Pune
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Asha Bhosle Favourite Hotel In Pune : पद्मविभूषण जेष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनानं संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आशाताईंच्या जाण्यानं कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांकडूनही सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच आशा भोसले यांचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. त्यांचं संगीतावर जितकं प्रेम होतं तितकचं त्या खवय्याही होत्या. 1997 पासून सिंहगड रस्त्यावरील हॉटेल शेतकरी येथे सहकुटुंब मटण थाळीचा आस्वाद घेण्यासाठी त्या यायच्या.

हॉटेल शेतकरीचे मालक संदीप मुडशिंगेकर आणि त्यांच्या पत्नी रश्मी मुडशिंगेकर यांच्यासोबत जवळपास 25 वर्षापासून आशाताई संपर्कात होत्या. मुंबईवरून पुण्याला निघाल्यानंतर प्रवासादरम्यान त्या फोन करून मटन थाळी तयार ठेवण्या संदर्भात ऑर्डर देत असे. आशाताईंना सुक्क मटण भाकरी चपाती मखनी पुलाव प्रचंड आवडत असे अशा आठवणी मालक संदीप मुडशिंगेकर यांनी सांगितल्या. 

नक्की वाचा >>Kalyan News: केडीएमसीच्या 2 महिला कर्मचाऱ्यांचा बारमधील धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल, कल्याणमध्ये खळबळ

हॉटेल शेतकरीमध्ये आशा भोसलेंनी कधी दिली पहिली भेट?

पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पायाभरणी वेळी 1997 ला त्यांनी पहिल्यांदा हॉटेलला भेट दिली. त्यानंतर मुलगा आनंद भोसले सुनबाई अनुजा भोसले नात जनाई भोसले यांच्या समवेत त्या नेहमी हॉटेल शेतकरी मध्ये जेवायला जात असत. गेल्याच आठवड्यात आशाताईंना मटन बनवून त्यांना जेवू घातले. त्यावेळी त्यांच्याशी शेवटचा संभाषण झालं. अशा आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणवले.

नक्की वाचा >> Dombivli News: भर रस्त्यात कार चालक आणि मित्रावर केला प्राणघातक हल्ला, डोबिंवलीतील घटनेमागचं कारण थक्क करणारं

आशाताईंना तांबडा रस्सा पांढरा रस्सा प्रचंड आवडायचा

आशाताईंना तांबडा रस्सा पांढरा रस्सा प्रचंड आवडत असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्या अत्यंत मनमिळावू, आवर्जून कुटुंबीयांची विचारपूस करणाऱ्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. त्यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो हॉटेलच्या दर्शनी भागामध्ये लावण्यात आलेले आहे. शिवाजी पार्क येथे अंतिम दर्शनासाठी जाणार असल्यासही त्यांनी सांगितले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com