पंढरपूर आषाढी वारी अंतिम टप्यात आहे. दरम्यान यंदा पंढरपूरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री स्वतः पंढरपूर मधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत याकरिता ते पंढरपूरला जाणार आहेत. 17 जुलै रोजी आषाढी एकादशीला देशभरातील भाविक पंढरपूरात दाखल होतील. यासाठी नागरिकांच्या दर्शनात अडसर येऊ नये आणि प्रवास सोयीचा व्हावा यासाठी लाल परी सज्ज आहे. पंढरपूरला जाण्यासाठी आणि परतीसाठी राज्य परिवहन महामंडळाची तयारी पूर्ण झाली आहे.
थेट पंढरपुरहून गाड्या...
कोणत्याही गावातून किमान ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी प्रवासाची एकत्र मागणी केल्यास त्यांना पंढरपूरपर्यंत थेट एसटीची सेवा देण्यात येईल
या सोईसाठी प्रवाशांनी जवळच्या आगाराशी संपर्क करा..
नक्की वाचा - पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ'ची स्थापना
सवलत...
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 50 टक्के सवलत
चार तात्पुरती बस स्थानकं...
चंद्रभागेहून मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि पंढरपूर आगारासाठी बसेस सोडण्यात येतील.
भीमा नदीवरून छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीसाठी बसेस सोडण्यात येतील
विठ्ठल कारखान्याहून नाशिक, जळगाव, धुळे, नगरसाठी गाड्या सोडण्यात येतील
पांडुरंग येथून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग साठी बसेस सोडण्यात येतील.