जाहिरात

Ashok Kharat Case: 'घोर अपराध...', भोंदूबाबाचा पोलिसांसमोर 'थयथयाट', मग थरकाप, पहिल्या दिवशी काय घडलं?

Ashok Kharat Case Update: नाशिकच्या गुन्हे शाखेने 'चोर' शिरल्याचा बनाव करून अशोक खरातला बेडरूममधून अटक केली. पोलीस कोठडीत मौन पाळणाऱ्या खरातने पोलिसी खाक्या बघताच 'घोर अपराध' म्हणत आरडाओरड केल्याने खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat Case: 'घोर अपराध...', भोंदूबाबाचा पोलिसांसमोर 'थयथयाट', मग थरकाप, पहिल्या दिवशी काय घडलं?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात पोलीस कोठडीत चांगली जिरल्याचं आता समोर येत आहे. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीतील पहिल्या काही तासांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांसमोर सुरुवातीला साधुत्वाचा आव आणणाऱ्या खरातला शेवटी पोलिसी खाक्यासमोर नतमस्तक व्हावे लागले.

पोलीस कोठडीतील अवतार

मिळालेल्या माहितीनुसार, कोठडीत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी खरातने कमालीची शांतता पाळली होती. एकप्रकारे त्याने मौनव्रत धारण केलं होतं. तपासादरम्यान विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता खरातने अनेक तास शांत राहणे पसंत केलं. तो कोणत्याही गुन्ह्याची कबुली देण्यास तयार नव्हता.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)

"घोर अपराध.. घोर अपराध.."

जेव्हा पोलिसांनी आपली कठोर उलटतपासणी सुरू केली, तेव्हा खरात अचानक संतापला. डोळे मोठे करून आणि थरथर कापत तो मोठ्या आवाजात "घोर अपराध.. घोर अपराध.." असे ओरडू लागला. त्याचा तो भयानक आवाज ऐकून बाहेर उभे असलेले गुन्हे शाखेचे कर्मचारीही घाबरून आत धावले. मात्र, काही वेळातच पोलिसांच्या तड्याख्यामुळे काही वेळातच त्याला चांगलाच घाम फुटला आणि तो पुन्हा शांत झाला.

'सिनेस्टाईल' पद्धतीने केलेली अटक

अशोक खरातला अटक करण्यासाठी नाशिक क्राईम ब्रांचच्या 'गुंडा स्कॉड'ने अत्यंत गोपनीय प्लॅन आखला होता. पाच पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली, पण सहभागी कर्मचाऱ्यांनाही आपण नक्की कुठे जातोय, याची पुसटशी कल्पना नव्हती. मंगळवारी रात्री खरातच्या घराबाहेर पोलिसांनी "घरात चोर शिरला आहे" असा आरडाओरड केला. यामुळे खरातला सावध होण्याची संधीच मिळाली नाही. गोंधळ सुरू असतानाच पोलीस पथक थेट घरात घुसले आणि बेडरूममध्ये असलेल्या खरातला गाठून त्याला बेड्या ठोकल्या.

(नक्की वाचा- Sunil Tatkare: अशोक खरात प्रकरण तटकरेंनाही भोवणार; चाकणकरांप्रमाणे फोटो व्हायरल झाल्याने अडचणीत?)

अशोक खरातच्या विरोधात आता अनेक पीडिता पुढे येत असून, त्याच्या आश्रमातील अघोरी पूजा आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे रेकॉर्ड्स आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा आणि मंत्रालयापर्यंत वजन असल्याचा दावा करणारा खरात आता पोलिसांच्या कोठडीत हतबल झाला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com