
किशोर बेलसरे, नाशिक
नाशिकच्या सिन्नरमध्ये तीन मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नरच्या वडगाव पिंगळे गावात ही घटना आहे. एका विहिरीत कासव असल्याची बतावणी करत संशयित आरोपी अमोल लांडगेने तिन्ही शाळकरी मुलांना चक्क विहिरीत ढकलून दिलं.
त्यातील एका मुलाने विहिरीतील दोरीला पकडून स्वतः सावरत इतर दोघांचा जीव वाचवला. या तिघांनी घरी आई-वडिलांना संपूर्ण कैफियत सांगितली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी अमोल लांडगेला अटक करण्यात आली आहे. तिघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
(नक्की वाचा- Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक)
(नक्की वाचा: जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआ घेणार बाहेरची मदत, बैठकीत नेमकं काय ठरलं?)
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सिन्नर पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे या संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र अमोलने तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न काय केला याबाबत पोलीस तपास करत आहे.