जाहिरात

छत्रपती संभाजीनगरात 'या' पदवी परीक्षेचा पेपर फुटला, 140 रुपयात WhatsApp वर पेपर विकले, कसा झाला पर्दाफाश?

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पदवी परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यापीठ प्रशासनासह विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगरात 'या' पदवी परीक्षेचा पेपर फुटला, 140 रुपयात WhatsApp वर पेपर विकले, कसा झाला पर्दाफाश?
Chhatrapati Sambhaji Nagar Paper leak

मोसिन शेख, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhaji Nagar Degree Paper Leak News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पदवी परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यापीठ प्रशासनासह विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. बीकॉम तृतीय वर्षाचा 'डायरेक्ट टॅक्स' या विषयाचा पेपर चक्क सोशल मीडियावर विकला गेला.परीक्षेची वेळ होण्याच्या एक तास आधी हा पेपर व्हॉट्सॲपच्या विविध ग्रुप्सवर फिरत होता.ज्या विषयाच्या अभ्यासासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत घेतात,त्या पेपरचा सौदा अवघ्या 140 रुपयांत करण्यात आला. चहा-नाश्त्याच्या किमतीत विद्यापीठाचा गोपनीय पेपर रस्त्यावर आल्याने कॉपी बहादरांचे चांगलेच फावले. मात्र एका विद्यालयाच्या प्रशासनाची ही बाब लक्षात येताच हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

'डायरेक्ट टॅक्स'या विषयाचा पेपर कसा फुटला?

अधिक माहितीनुसार मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संचालक सतीश सुराणा यांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पेपरबाबत काहीतरी गोष्टी सुरू असल्याचा दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या कानावर येत होतं. आज बीकॉम तृतीय वर्षाचा 'डायरेक्ट टॅक्स'या विषयाचा पेपर होता.पण पेपर असताना देखील विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात नेहमीप्रमाणे दिसत नसल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या मदतीने माहिती घेतली असता महाविद्यालयाच्या बाहेर दोन वाजता सुरू होणारा पेपर एक वाजताच सोशल मीडियावर विकला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' कॉलेजमध्ये मधमाशांचे पोळे अन् बरंच काही..विद्यार्थ्यींनी केलं बोंब ठोक आंदोलन

​हा सगळा धक्कादायक प्रकार कळताच सुराना यांनी कसलाही विलंब न लावता थेट विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला आणि या महाघोटाळ्याची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परीक्षा नियंत्रकांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.हा पेपर कुठून आणि कोणाच्या माध्यमातून फुटला, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. 

नक्की वाचा >> Konkan News: कोकणच्या मालवणमधील लोक धास्तावले..'त्या' गावात घडली अनोखी घटना, सगळीकडे तुफान चर्चा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com