जाहिरात

नवी मुंबई पोलिसांत 'हफ्ता-नेक्सस'? वसुलीचा व्हिडिओ व्हायरल; कोंडीने नागरिक त्रस्त, तर पोलीस 'वसुली'त व्यस्त

नवी मुंबईत एका बाजूला वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले असतानाच, दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर 'हफ्ता-नेक्सस'चे गंभीर आरोप होत आहेत.

नवी मुंबई पोलिसांत 'हफ्ता-नेक्सस'? वसुलीचा व्हिडिओ व्हायरल; कोंडीने नागरिक त्रस्त, तर पोलीस 'वसुली'त व्यस्त
Navi Mumbai Police News
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Viral Video : नवी मुंबईत एका बाजूला वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले असतानाच, दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर 'हफ्ता-नेक्सस'चे गंभीर आरोप होत आहेत. वसुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांचा पाठलाग करून पैसे घेतल्याचा आरोप होत असून, यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वसुलीचे 'स्पॉट' अन् नागरिकांचे प्रश्न

वाशी, कोपरखैरणे, नेरूळ आणि बेलापूर (कोकण भवन) परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनुसार, पोलीस प्रत्यक्ष कोंडी सोडवण्याऐवजी सिग्नलच्या मागे लपून उभे राहतात आणि केवळ दंड वसुलीवर भर देतात. डंपर, अवजड वाहतूक आणि बार-रेस्टॉरंटसमोरील बेकायदेशीर पार्किंगला पैशांच्या मोबदल्यात अभय दिले जात असल्याचा आरोप आहे. या कथित वसुली मागे अनिल मोहिते नावाच्या व्यक्तीचे नाव चर्चेत असून, पोलीस आयुक्त त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा >> आधरवाडी तुरुंगासमोरील 'त्या' बंगल्याची का होतेय चर्चा? KDMC अधिकाऱ्यांनी पाहणी करताच 'ते' सत्य आलं समोर

'ड्रिंक अँड ड्राईव्ह' कारवाईवर संशय

शहरात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' विरुद्ध मोठी मोहीम राबवली जात असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात पकडलेल्या अनेक चालकांकडून पैसे घेऊन त्यांना सोडले जात असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मोजक्याच लोकांवर गुन्हे दाखल करून उर्वरित प्रकरणांमध्ये 'सेटलमेंट' होत असल्याची चर्चा आहे.

वाढते अपघात अन् प्रशासकीय दुर्लक्ष

शहरात सुरू असलेली रस्ते खोदकामे, पुलांची रखडलेली कामे आणि 'पार्टी बस'सारख्या प्रकारांकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नोकरदार वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास कोंडीत अडकून राहावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिक, नोकरदार वर्ग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील या कथित भ्रष्ट हफ्ता-नेक्ससची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वाहतूक कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे आता या मागील कथित मास्टरमाईंड अनिल मोहिते याच्यावर काय कारवाई करतील याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com