बच्चू कडू महायुतीत नाराज? तिसरी आघाडी करुन विधानसभा स्वतंत्र लढणार?

Political News : शेतकरी, मजुरांबाबत काँग्रेसनं ते केलं तेच भाजपच्या राज्यात देखील होत आहे. बेईमानी करुन जगाणारे मोठे होते आहेत. मात्र श्रमाच्या आधारे जगणाऱ्यांना काही मिळत नाही.  

जाहिरात
Read Time: 2 mins

ंआगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसोबत आता राज्यात तिसरी आघाडी  तयार होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रहारच्या बच्चू कडू यांनी तसे संकेत दिले आहेत. 

बच्चू कडू यांनी याबाबत म्हटलं की, मी रविकांत तुपकर, आप आणि इतर पक्षांसोबतच चर्चा होत आहे. आता तरी पूर्ण चर्चा झालेली नाही. आपण एकत्र येऊन शेतकरी, मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे. आविधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करु. मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

(नक्की वाचा- अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला; आमदारांसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन)

शेतकरी, मजुरांबाबत काँग्रेसनं ते केलं तेच भाजपच्या राज्यात देखील होत आहे. बेईमानी करुन जगाणारे मोठे होते आहेत. मात्र श्रमाच्या आधारे जगणाऱ्यांना काही मिळत नाही.  मजूर, शेतकरी, त्याचे काय त्यांना काही मिळत नाही. आमचा बाप शेतकरी आहे. त्यांच्याशिवाय आमचा पत्ता हलणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.  

शासकीय योजनांमधून कष्टकऱ्यांना काही मिळताना दिसत नाही. योजना काढल्या पाहिजे मान्य आहे. पण शेतमालाच्या भावाचं काय? दूधाच्या दराचं काय? मजूरांचं काय? ज्याचं आयुष्य कामात जातं त्याला बोनस द्या. सगळी गरीब-श्रीमंत विषमतेची दरी निर्माण होत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

Advertisement

(नक्की वाचा - Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्याला आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा)

लोकसभा निवडणुकीनंतर वारं फिरल्याने भूमिका बदलली का? यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, असं असतं तर मी महाविकास आघाडीसोबत गेलो असतो. मात्र तसं नाही आहे. शेतकऱ्यांना काही मिळायला पाहिजे हे आम्ही म्हणतोय. शेतकऱ्यांबाबत मेल्यावरच बच्चू कडून बदलेल असंही त्यांनी म्हटलं.