जाहिरात
This Article is From Jul 09, 2024

अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला; आमदारांसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानपरिषद निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आली.

अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला; आमदारांसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज शुभ दिवस आहे त्यामुळे आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

आम्ही आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, तर बाप्पा आम्हाला आशीर्वाद द्यावे, असं साकडं घातलं. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आम्ही समोर जात आहोत. त्यासाठी आजच्या चांगल्या दिवसाने आम्ही सुरुवात केली आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीचा विधानसभेचा रोड मॅप

राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानपरिषद निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ह्या बैठकीत प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाण्याबाबत ठरवण्यात आलं. 

बैठकीत काय ठरलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या बैठकीत विधानसभेचा रोड मॅप ठरला आहे. पुढच्या 90 दिवसात विधानसभा निवडणुकीचा प्लॅन राबवला जाणार आहे. पक्षाकडून अजित पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार आहे.  शब्दाला पक्का अजितदादा अशा आशयाचे कॅम्पेन राबवले जाणार आहे.  अर्थसंकल्पात अजितदादा यांनी घोषणा केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, त्याचा फायदा लोकांना करून द्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: