- बदलापूर स्टेशनच्या बाहेर वाईन शॉपसमोर बेकायदेशीरपणे तळीराम मद्यपान करतात, ज्यामुळे नागरिकांना त्रास आहेत
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी रात्री वाईन शॉपवर हल्लाबोल केला
- बदलापूर परिसरात रात्री नशेखोर तरुण फिरतात, ज्यामुळे महिलांना छेडछाड आणि अन्य समस्यांचा सामना करावा लागतो
अमजद खान
वाईन शॉपबाहेर अनेक तळीराम बेकायदेशीरपणे दारू पितात. त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्यांना होतो. खास करून महिलांना त्याचा होणार त्रास जास्त आहे. ही सर्रास पणे बदलापूर स्टेशन बाहेर असलेल्या वाईन शॉप बाहेरचे चित्र आहे. अशा तळीरामांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी मोर्चा उघडला आहे. त्यांनी रात्रीच्या वेळी या वाईन शॉपवर हल्लाबोल केला. त्यावेळी तिथले चित्र अतिशय गंभीर होते. त्यांनी तिथे असलेल्या तळीरामांना जाब विचारला. त्याच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बदलापूरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. रात्रीच्या वेळेस नशेखोर आणि मद्यपी तरुण रस्त्यावर फिरतात. त्याचा नागरिकांना त्रास देखील होतो. यासंदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. बदलापूर स्टेशन बाहेर काही न काही प्रकार सुरू असतात. बदलापूर स्टेशन परिसरात असलेल्या पूजा वाईन्स शॉपबाहेर काही तळीराम दारू खरेदी करतात. त्यानंतर तिथेच बसून मद्यपान करतात. असा आरोप वारंवार होत आहे. यामुळे परिसरातील महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय छेडछाडीच्या घटना वाढल्याच्या तक्रारी संगीता चेंदवणकर यांच्याकडे आल्या होत्या.
परंतु वाईन शॉपमधून दारू घेऊन पिणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. काही दिवसापूर्वी बदलापूरच्या नगराध्यक्ष यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला होता. वाईन शॉपच्या बाहेर एखादा व्यक्ती दारू पीताना आढळल्यास वाईन शॉप विरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. परंतु त्याचा काही फायदा होताना दिसत नाही असचं म्हणावं लागेल. त्यानंतर रात्रीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर या वाईन शॉपच्या इथं अचानक धडकल्या. त्यावेळी तिथे बेकायदेशीरपणे तळीराम दारू पित होते. त्यांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला. वाईन शॉप चालकाकडूनच अशा प्रकारांना मुभा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चेंदवणकर अचानक आल्याने तिथे असलेल्या तळीरामांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांच्या समोरच काही जण दारू पित होते. त्यांना त्यांनी जाब विचारला. पण तिथून त्यांनी पळ काढला. मग त्यांनी वाईन शॉपच्या मालकाला याचा जाब विचारला. लोक इथं बाहेर उभे राहून दारू कसे पित आहेत अशी विचारणा केली. शिवाय दारू पिऊन रिकाम्या बाटल्या टाकलेल्या ड्रम ही त्यांनी दाखवला. त्यानंतर वाईन शॉप मालकाला काहीच बोलता आले नाही. यापुढे असं स्थिती दिसली तर मोठी कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world