Badlapur Iyengar Bakery News : बदलापुरात केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.याप्रकरणी गायकवाड यांनी दुकानात जाऊन जाब विचारला तेव्हा दुकानात खारीवर उंदीर फिरत असल्याचं आढळलं.केक बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी चक्क टॉयलेटच्या कमोडवर ठेवल्याचं किळसवाणं दृश्य पाहायला मिळालं.या प्रकरणी तक्रार केल्यानंतर एफडीएचे पथक बेकरीत दाखल झाले आहे पुढील प्रक्रिया सुरू आहे.
बेलवली आणि कात्रपमध्ये या बेकरीचे दोन शॉप
बदलापूरमध्ये अय्यंगार फ्रेश केक नावाची बेकरी असून त्यांचे बेलवली आणि कात्रप मध्ये दोन शॉप आहेत. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी बेलवलीच्या बेकरीतून रवा केक आणला होता. हा केक खाताना हर्षाली गायकवाड यांना केकमध्ये उंदराची विष्ठा असल्याचं आढळलं आणि त्यांना उलट्या,मळमळ याचा त्रास झाला.याचा जाब विचारण्यासाठी त्या बेकरीत गेल्या असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी ही उंदराची विष्ठा नसून चोकोचिप असल्याचं सांगितलं.मात्र केक टेस्टिंगसाठी पाठवते,असं त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्यांनी चूक कबूल केली.
नक्की वाचा >> Ulhasnagar News: उल्हासनगर हादरलं! आईने 20 वर्षीय मुलीला संपवलं, लव्ह अफेअरचं कनेक्शन आलं समोर
केक बनवायची भांडी चक्क टॉयलेटच्या कमोडवर
याचदरम्यान या बेकरीत खारीमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ देखील समोर आला.तर नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी केक बनवणाऱ्या जागेची पाहणी केली. अतिशय अस्वच्छ वातावरण आणि केक बनवायची भांडी चक्क टॉयलेटच्या कमोडवर ठेवल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला.त्यामुळं आता या बेकारीची एफडीएकडे तक्रार करण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही बेकरी बंद करावी,अशी मागणी आता केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world