मनोज सातवी, पालघर
विधानसभा निवडणुकीच्या एकदिवस आधी मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोरदार राडा घातला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने थेट भाजपला पाठिंबा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे मतदानाच्या काही तास आधी पालघर जिल्हा चर्चेत आला आहे. अशारितीने सकाळपासून विरारमध्ये तुफान बॅंटिंग करणारा बहुजन विकास आघाडी पक्ष डहाणूत हिट विकेट झाला आहे.
(नक्की वाचा- VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा)
डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलं आहे. डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी अचानक डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदानाच्या एक दिवस आधीच बविआच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे बविआला मोठा धक्का बसला आहे.
(नक्की वाचा- "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा )
भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत सुरेश पाडवी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अशारितीने सुरेश पाडवी यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. "मते खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं तर आमच्या ग्रामीण पट्ट्याचा विकास खुंटलेला आहे तो वेगाने होईल. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांसह भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे", असं सुरेश पाडवी यांनी म्हटलं आहे