संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Pandharpur Viral News Today : पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात दारूबंदी करावी,या मागणीसाठी गावातील महिला आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पोलिसांकडे आग्रही मागणी केली आहे.विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या दारात येऊन महिलांनी दारूबंदी करावी यासाठी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला.त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात दारूबंदी होणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भीमा नदी काठावर पंढरपूर तालुक्यात वसलेल्या सरकोली गावात गावात दारू विक्री आणि दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने गावातील महिलांचे आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान होत आहे.त्यामुळे गावातील दारूबंदी तात्काळ बंद करावी आणि सरकोली गाव दारूमुक्त करावे,अशी मागणी सरकोलीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज पंढरपूर पोलीस ठाण्यात केली.
नक्की वाचा >> Maharashtra Rain : पाच-सहा दिवस वाट बघा..सलग 9 दिवस महाराष्ट्रात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा मोठा अलर्ट
पुरूष दररोज दारू पितात अन् महिलांना त्रास देतात
पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील अनेक लोक शेतात काम करतात तर काही नोकरी निमित्त बाहेर जातात.मात्र गावातील दहा ते पंधरा लोक दारू विक्री करत असल्याने गावातील पुरुष मंडळी दररोज दारू पितात आणि महिलांना त्रास देतात.याच त्रासाला कंटाळून महिलांनी आज पोलीस ठाण्यावर दारूबंदीसाठी मोर्चा काढला.दारू विक्री आणि दारू सेवन केल्यामुळे एकाच घरातील तीन ते चार व्यक्ती सरकोली गावातील मृत झाले असल्याचे देखील यावेळी महिलांनी सांगितले.
नक्की वाचा >>Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट संघात परतणार? पण 'या' एका अटीवर
कुटुंब वाचवण्यासाठी दारूबंदी गरजेची
त्यामुळे घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी दारूबंदी गरजेची असल्याचा भूमिका महिलांची आहे.दारूबंदी करण्यासाठी सरकोली गावातील महिला आणि काही व्यक्तींनी पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना याबाबतचे निवेदनही दिले.त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील दारूबंदीचा विषय सध्या चर्चेला आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world