"आमचं ठरलयं...", बारामतीत अखेरच्या क्षणी 'लेटर पॉलिटिक्स'

Baramati Letter Viral : युगेंद्र पवार यांनी कोणती विकासकामे केली आहेत, अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे. केवळ भावनिक राजकारण सुरु असल्याची टीका देखील या पत्रातून करण्यात आली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा आहे. सर्वच पक्ष प्रचारात फायनल टच देण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारसभा टाळून भेटीगाठी, चौकसभा अशारितीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बारामतीत अखेरच्या दिवशी लेटर पॉलिटिक्स सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'यावेळी अजितदादाच, आमचं ठरलंय', अशा आशयाचं पत्र सध्या बारामतीत व्हायरल होत आहे. 

'आदरणीय ताई' यांना उद्देशून पत्र व्हायरल होत आहे. मात्र हे पत्र कुणी लिहिलंय याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. युगेंद्र पवार यांनी कोणती विकासकामे केली आहेत, अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे. केवळ भावनिक राजकारण सुरु असल्याची टीका देखील या पत्रातून करण्यात आली आहे.  

(नक्की वाचा: प्रियांका गांधींच्या रॅलीत तुफान राडा! काँग्रेस- भाजप कार्यकर्ते भिडले; राजकारण का तापलं?)

पत्रात नेमकं काय म्हटलंय? 

"राम कृष्ण हरी, आदरणीय ताई, पत्र लिहिण्यास कारण की, मी एक बारामतीकर बोलतोय ताई. ताई... समदे क्रायटेरीया बाजूला ठेवून युगेंद्रला इतक्या लवकर तिकीट देण्याची का हो केली घाई? काटेवाडी, आशाताई, आमराई यांच्याच नुसत्या का सांगताय आठवणी? अहो युगेंद्रने केलेल्या विकासाची सांगा की हो कहाणी! आणताय नुसता भावनेचा पूर... आणि ताई विकासाचा मुद्दा ठेवताय दुर..!" 

(नक्की वाचा - निवडणूक महाराष्ट्राची पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा का?)

"आम्हाला साहेब आणि दादा, दोन्ही हवेत बघा. आता या निवडणुकीत काय करायचं?, कोणाच्या पाठी उभं रहायचं? हा पडलेला प्रश्न आम्ही विठ्ठलालाच विचारला बघा. तो हसून म्हणला, "एकदा साहेबांकडे बघून ताईला निवडून दिलं ते पुरे, आता ज्यानं काम केलं त्याच्याच पाठी उभं रहायचं, त्यालाच मत द्यायचं. आणि आता विकासाच्या वारीतच वारकरी व्हायचं." 

"ताई, आता हीच आमची विचारधारा, भावनेला नाही आता थारा ! आणि विकास करेल तोच खरा!! म्हणून ह्यावेळी अजित दादाच, असं आमचं ठरलयं. आणि ताई, अख्ख्या महाराष्ट्राला हे कळलये."

Topics mentioned in this article