Nagpur News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने' भारताची भीमज्योत' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "आपल्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत अनुभवायला नक्की या," असे आवाहन करत या सोहळ्याची जय्यत तयारी नागपुरात सुरू आहे.
दीक्षाभूमी ते चैत्यभूमी
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ एक जयंती उत्सव नसून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचा जागर आहे. 'दीक्षाभूमी ते चैत्यभूमी' या प्रवासातील बाबासाहेबांचे कार्य आणि त्यांचे सामाजिक योगदान यावर या कार्यक्रमात प्रकाश टाकला जाणार आहे.

कार्यक्रमाचे तपशील आणि प्रमुख उपस्थिती
नागपूरच्या कविवर्य सुरेश भट नाट्यगृहात 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. राज्यातील दलित बांधवांना संघटित करण्यासाठी आणि बाबासाहेबांचे स्वप्न साकारण्यासाठी या 'भीमज्योत' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world