Political News : विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून ही 3 नावे चर्चेत; आजच्या बैठकीत नाव निश्चित होण्याची शक्यता

Political News : विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून  विरोधी पक्षनेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shivsena Thackeray Group Meeting : शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर  बैठक पार पडणार आहे.  बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत असेल आउटगोइंग थांबवणे, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

विधानसभा विरोधी पक्षनेत्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. 

विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चा होत आहे. ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीत विरोधीपक्षनेते पदासाठी कोणाच नावं अंतिम करायचं? यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून  विरोधी पक्षनेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे आगामी अधिवेशनात याबाबत विचार केला जाऊ शकतो.

Advertisement

येणाऱ्या अधिवेशनात कोणते विषय आमदारांनी  मांडायचे? राज्यातील सामान्यांचे प्रश्न याशिवाय गाजत असलेले विषय मांडून सरकारला घेरण्यासाठीची रणनीती या आमदारांच्या बैठकीत ठरवली जाणार आहे. 

Topics mentioned in this article