जाहिरात

Bhiwandi Building Collapse Update: भिवंडीत 4 मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला; 9 जणांचा मृत्यू

Thane News: भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील गंगाराम वाडी परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात इमारतीच्या मलब्याखाली 8 ते 10 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bhiwandi Building Collapse Update: भिवंडीत 4 मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला; 9 जणांचा मृत्यू

रिझवान शेख, ठाणे

Thane News: भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड स्थित गंगाराम वाडी परिसरात शुक्रवारी उशिरा रात्री एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या भागात असलेली एक चार मजली इमारत अचानक कोसळली. इमारतीचा मोठा भाग कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अग्निशामक दल आणि एनडीआरएफ घटनास्थळी दाखल

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दल आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन चालवले जात आहे.

प्रशासनाचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  बचावकार्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या दुर्घटनेत नक्की किती लोक जखमी झाले आहेत किंवा कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत प्रशासकीय माहिती समोर आलेली नाही.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com