Gold Silver Price Today| 10th February: लग्नसराईच्या हंगामात मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये वाढ सुरूच आहे. 'India Bullions' च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी (10 फेब्रुवारी) चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 2.63 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ होऊन दर 1.58 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, ऐतिहासिक घसरणीनंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे दर घसरले. सिंगापूरमध्ये स्पॉट गोल्ड 0.5%ने घसरून $5,032.53 प्रति औंस झाले आहे तर चांदी 1.8% ने घसरून $81.92 वर आलीय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार, एप्रिलचा सोन्याचं कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट 0.2% ने वाढून 1 लाख 58 हजार 394 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता, जो सोमवारी (9 फेब्रुवारी) 1 लाख 58 हजार 066 रुपयांवर बंद झाला होता. मार्च महिन्यासाठीचा चांदीचं कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट Rs 2,62,745 प्रति किलोवर स्थिर होता.
10 फेब्रुवारीचे सोन्याचे दर | 10 February Gold Rate
शहरांनुसार विचार केला तर दक्षिण भारतातील शहरांमध्ये सोन्याचे दर देशात सर्वाधिक आहेत. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 158,820 रुपये असून तो देशात सर्वाधिक आहे. मुंबईत सोन्याचा दर 158,360 रुपये तर दिल्लीत 158,080 रुपये इतका दर आहे. कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्येही सोन्याचे दर 1.58 लाख रुपयांच्या पुढेच आहेत.
10 फेब्रुवारीचे चांदीचे दर | 10 February Silver Rate
चांदीच्या बाबतीतही चेन्नई आघाडीवर असून तिथे एक किलो चांदीचे दर 264,040 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत चांदीचे दर 263,270 रुपये तर दिल्लीत 262,820 रुपये इतके दर आहेत.
शहरानुसार सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई: 158,360 रुपये
दिल्ली: 158,080 रुपये
बंगळुरू: 158,480 रुपये
चेन्नई: 158,820 रुपये
हैदराबाद: 158,610 रुपये
कोलकाता: 158,150 रुपये
शहरानुसार चांदीचे दर (प्रति 1 किलो)
मुंबई: 263,270 रुपये
दिल्ली: 262,820 रुपये
बंगळुरू: 263,480 रुपये
चेन्नई: 264,040 रुपये
हैदराबाद: 263,690 रुपये
कोलकाता: 262,930 रुपये
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world