अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan Attacked) घरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रात्री अडीच वाजता हा हल्ला झाला. त्या सैफवर सहा वार करण्यात आले. विशेष म्हणजे हा हल्लेखोराला कुणीही पाहीले नाही. किंवा हल्ल्यानंतर ही त्याला कुणी पकडले नाही. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडच्या ऐवढ्या मोठ्या स्टारच्या घरात इतक्या सहज कुणी घुसू शकतो का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय तो इतक्या सहज घरात जातो. हल्ला करतो आणि तितक्याच सहजतेने तो पळून ही जातो. या सर्व प्रश्नांनी मुंबई पोलिस हैराण झाले आहेत. त्यामुळे या हल्ल्या मागे घरातीलच कुणी आहे की काय? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत आता पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. त्यातून मुंबई पोलिसां समोर 8 प्रश्न आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सैफच्या घरी हल्लेखोर कसा घुसला?
सर्वात पहिला प्रश्न हा आहे की सैफच्या घरा बाहेर इतकी सुरक्षा असताना हा हल्लेखोर घरात कसा घुसला. शिवाय त्याला तिथल्या सीसीटीव्हीची कल्पना होती का? सीसीटीव्हीच्या ही नजरेत तो आला कसा नाही? त्यामुळे सैफच्या घरात इतक्या सहजतेने कसा घुसला. ऐवढचं नाही तर तो सैफच्या बेडरूम पर्यंत पोहचला हा ही मोठा प्रश्न आहे.
हल्ला झाला त्यावेळी सुरक्षा रक्षक कुठे होते?
बॉलिवुड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या जवळपास सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. वीना परवानगी त्यांच्या जवळही कुणी जावू शकत नाही. अशा स्थितीत त्यांच्या घरात घुसणे ही मोठी गोष्ट झाली. पण ज्या वेळी सैफवर हल्ला झाला त्यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक कुठे होते? हल्ल्या वेळी सुरक्षा रक्षक त्याला वाचवण्यासाठी का आले नाहीत? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
या हल्ल्यामागे कुणी घरातीलच व्यक्ती आहे का?
एखाद्या सामान्य माणसावर हल्ला करावा त्या पद्धतीने सैफवर हल्ला केला गेला. हल्लेखोर घरात घुसल्यानंतर आधी त्याने मेडवर हल्ला केला. त्यानंतर तो थेट सैफच्या रूममध्ये घुसला. त्याला जखमी करुन तो सहज पळूनही गेला. हे सर्व इतक सोपं आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे घरातीलच कुणी व्यक्ती या हल्ल्या मागे नाही ना? असा ही प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर आता सैफच्या घरात काम करणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
हल्लेखोराची फ्रेंडली एन्ट्री झाली होती का?
हल्लेखोर इतक्या फ्रेंडली सैफच्या घरात कसा घुसला? शिवाय हल्ला करून निघूनही गेला. सैफ 11 व्या मजल्यावर रहातो. अशा स्थितीत त्याच्या बेडरूमपर्यंत सहज पोहचणे कसे काय शक्य आहे?
मेड आणि चोराचं काही साटंलोटं आहे का?
ज्या वेळी हल्लेखोर घरात घुसला त्यावेळी सर्वात आधी त्याचा सामना घरात असलेल्या मेड बरोबर झाला. त्या दोघांमध्ये झटपटी झाली. त्यानंतर सैफ त्या दोघांमध्ये आला. असं मुंबई पोलिसांनी सांगितलं. हा सर्व घटनाक्रम चक्रावून सोडणारा आहे. प्रश्न असा उपस्थित होत आहे की, मेड बरोबर चोराने झटापट का केली? तो हल्लेखोर पहिल्यापासून मेडला ओळखत होता का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
11 व्या माळ्यावर हल्लेखोर कसा पोहचला?
मुंबईतल्या वांद्रे परिसरात सैफ अली खान याचा फ्लॅट आहे. तो 11 व्या मजल्यावर राहतो. इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा आहे. असं असताना अगदी सहज पणे हा हल्लेखोर 11 व्या मजल्यापर्यंत कसा गेला. सोसायटीमध्ये जाण्यासाठी आधी एन्ट्री करावी लागते. असं असताना ऐवढ्या हाय प्रोफाईल इमारतीत हा हल्लेखोर सहजतेने कसा काय आत घुसला? असं सांगितलं जात आहे की तो पाईपच्या सहाय्याने सैफच्या फ्लॅटमध्ये घुसला.
हल्लेखोर 11 व्या मजल्यावर पाईपच्या मदतीने चढला?
हल्लेखोर पाईपच्या सहाय्याने सैफच्या फ्लॅटमध्ये घुसला का? हे शक्य आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शिवाय चोराने सैफच्याच घराला कसं लक्ष केलं हा ही प्रश्न पोलिसां समोर आहे.
सैफवर हल्ला झाला ते घरातल्यांना समजलं नाही का?
सैफवर हल्ला झाला त्यावेळी घरातले अन्य सदस्य कुठे होते? करीना कपूर, तैमूर आणि जेह हे त्यावेळी कुठे होते? शिवाय त्यांच्या घरातील स्टाफ कुठे होता? सुत्रानुसार हे सर्व जण घरातच होते. मात्र त्यांना हा हल्ला झाला आहे हे त्यावेळी समजले नाही का? असा ही प्रश्न आहे.