जाहिरात
3 days ago

Saif Ali Khan Attack News Live Updates : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attacked) त्याच्या राहत्या घरामध्ये अज्ञात व्यक्तीने घुसून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही. वांद्रे येथील सैफच्या घरामध्ये 16 जानेवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. 

(नक्की वाचा : Saif Ali Khan Stabbed: सैफ अली खानच्या घरात 'या' मार्गाने घुसला हल्लेखोर?)

शर्मिला टागोर, सोहा अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या

सैफ अली खानची आई शर्मिला टागोर आणि बहीण सोहा अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. सैफवर हल्ला झाल्यानंतर त्याच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी त्या आल्या होत्या. 

सैफवर हल्ला करणाऱ्याला शोधण्यासाठी 10 पोलिस पथकं - आशिष शेलार

सैफवर झालेला हल्ला हीबाब गंभीर आहे. सैफ अली खान यांची प्रकृती ठीक आहे अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. पाच तास जवळपास त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. सहा जखमा त्यांच्या शरीरावर आहेत. त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला शोधण्यासाठी दहा तपास पथकं पोलिसांकडून तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. आरोपीला लवकर अटक करण्यात येईल असंही ते म्हणाले. 

सैफची चौकशी करण्यासाठी आशिष शेलार लिलावती रुग्णालयात पोहोचले

मंत्री आशिष शेलार लीलावती हॉस्पिटल येथे सैफ अली खान यांच्या प्रकृतीचे विचारपूस करण्यासाठी पोहोचले आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही आले समोर

सैफ  अली खान याच्यावर हल्ला  करणाऱ्या हल्लेखोराचा फोटो प्रकाशीत करण्यात आला आहे. त्यानंतर या हल्लोखोराचा व्हिडीओही समोर आला आहे. हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर इमारती बाहेर जीन्यातून पळत होता. त्यावेळी तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.  

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो आला समोर

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने सैल अली खानवर हल्ला केला त्याचा फोटो समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी हा फोटो सार्वजनिक केला आहे. 

सैफ अली खानला कधी सोडायचं याचा निर्णय डॉक्टर उद्या घेणार

सैफ अली खानचे कुटुंब सध्या लिलावती हॉस्पिटलमध्ये आहे. सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे. सैफ अली खानला सध्या आयसीयु मध्ये ठेवण्यात आले आहे. सैफ अली खानच्या डिस्चार्ज बाबत डॉक्टर उद्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

सैफवर हल्ल्यानंतर ममता कुलकर्णीची पहिली प्रतिक्रीया

मला खुप दुख: झालं. जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मी सैफची तब्बेत लवकर सुधारावी अशी प्रार्थना करते, अशी प्रतिक्रीया अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने दिली आहे.    

सैफवर हल्ला आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

सरकारमधील कोणी तरी नागरिकांच्या  सुरक्षेची जबाबदारी घेणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सैफवर झालेला हल्ला हा धक्कादायक आहे. सैफ लवकरच बरा होईल अशी प्रार्थना त्यांनी केली. शिवाय गेल्या तीन वर्षापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहीली नाही अशी टीका ही त्यांनी केली.    

सैफ अली खानच्या मोलकरणीची चौकशी झाली पूर्ण

सैफ अली खान यांच्या घरातील मोलकरणीची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. चौकशी नंतर ती घरी परतली आहे. हल्लेखोराने पहिला हल्ला याच मोलकरणीवर केला होता.  

सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा- नाना पटोले

सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी ही या सरकारचे अपयश असल्याचे ते म्हणाले. निष्क्रीय फडणविसांनी गृहमंत्रीपद सोडावे अशी मागणीही त्यांनी केला. पोकळ विधाने करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यानी ठोस कृती करण्याचे धाडस दाखवावे असंही ते म्हणाले. 

सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, मुंबई पोलिसांची माहिती

पोलिसांच्या प्राथमिक माहिती नुसार ती अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसली होती. त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटली असून पोलिसांच्या टीम्स त्याला पकडण्यासाठी रवाना झाल्या आहेत.आरोपी जिन्याने सैफ अली खानच्या घरापर्यंत पोहोचला होता असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

अभिनेत्री करिश्मा कपूर लिलावतीमध्ये दाखल

सैफ अली खानच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो : मनोज तिवारी, भाजप खासदार

सैफ अली खान हल्ला प्रकरण : 2 संशयित आरोपी CCTVमध्ये कैद

  • पोलिसांकडून आजूबाजूच्या सर्व इमारातींमधील सीसीटीव्हीची तपासणी सुरू.
  • शेजारील इमारतीची भिंत चढून चोर सैफ अली खानच्या इमारतीत शिरला असल्याचा पोलीस सूत्रांचा दावा.
  • चोराने घरामध्ये घुसण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर केल्याची माहिती. 
  • हल्ल्यानंतर चोर मागील बाजूच्या गेटने फरार झाल्याची माहिती.
  • दोन संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद

अभिनेत्री करीना कपूर लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचा (निळा रंगाचा ड्रेस) वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला

सैफच्या जीवाला धोका नाही: डॉ. नितीन डांगे

न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सैफबाबत दिलेली माहिती

  • सैफच्या शरीरावर दोन गंभीर, दोन मध्यम स्वरुपाच्या जखमा आढळल्या आणि थोडेसे खरचटले देखील होते. 
  • अडीच इंची चाकूचा तुकडा मणक्यातून बाहेर काढला.
  • पहाटे 2 वाजेदरम्यान सैफला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 
  • चाकूचा तुकडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. 
  • डाव्या हाताला आणि मानेवरही जखमा आहेत. 
  • सैफ अली खानची प्रकृती सुधारते आहे, त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.

सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली

सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, अभिनेत्याच्या टीमने डॉक्टरांचे आभार मानले

सैफच्या चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या टीमकडून चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन 

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आढळला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्तीने शेजारच्या इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत उडी मारली होती. 

संशयित व्यक्ती दुसऱ्या इमारतीच्या कंपाउंडमधून सैफच्या इमारतीत आल्याचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले.

जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात: वर्षा गायकवाड, खासदार काँग्रेस

वडिलांना पाहण्यासाठी सारा आणि इब्राहिम हॉस्पिटलमध्ये दाखल

सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो: जितेंद्र आव्हाड, आमदार, राशप

सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पडली पार

डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, गंभीर जखमा मणक्याजवळ झाल्या आहेत. न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन आणि एनेस्थेटोलॉजिस्ट डॉ. निशा गांधी यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमने सैफवर शस्त्रक्रिया केली. 

पहाटेच्या सुमारास सैफ हॉस्पिटलमध्ये दाखल

लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरामध्ये अज्ञाताने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.  

सैफवर सहावेळा केले चाकूने वार

सैफ अली खानच्या पाठीवर सहावेळा चाकू हल्ला, यापैकी दोन जखमा गंभीर असल्याची लीलावती हॉस्पिटलची माहिती

एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्याकडून तपास सुरू

करीना आणि मुले सुरक्षित

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करीना कपूर आणि मुले तैमूर-जेह सुरक्षित आहेत.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी तीन लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान आणि घुसखोर व्यक्तीमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान सैफच्या कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. 

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com