Pune News: काल वाढदिवस साजरा केला अन् आज आयुष्याचा शेवट झाला! मंचरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.एका विद्यार्थ्याने काल रविवारी वाढदिवस साजरा केला आणि आज सोमवारी अपघातात त्याचा मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Manchar Accident News

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Manchar Accident News Today : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.एका विद्यार्थ्याने काल रविवारी वाढदिवस साजरा केला आणि आज सोमवारी अपघातात त्याचा मृत्यू झाला.वीर अनिल शिंदे (17) असं अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. अकरावीत नुकताच प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या चौथ्याच दिवशी भीषण अपघातात मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,वीर शिंदे हा आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील खालचा शिंदे मळा,वेताळेश्वर महाराज मंदिराशेजारी राहत होता.त्याने नुकताच मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीमध्ये प्रवेश घेतला होता.आज महाविद्यालयातील त्याचा अवघा चौथा दिवस होता.सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर वीर त्याच्या दोन मित्रांसोबत मोटारसायकलवरून घरी जात होता. 

Advertisement

नक्की वाचा >> Pandharpur News: पंढरपूरच्या 'या' गावात सुरुय नको तो खेळ! सर्व महिला एकत्र आल्या अन् थेट पोलीस स्टेशनच गाठलं

अपघातात वीरचे दोन्ही मित्र गंभीर जखमी

मात्र, महात्मा गांधी विद्यालयासमोरील चौकात त्यांच्या मोटारसायकलची राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसशी जोरदार धडक झाली.या भीषण अपघातात वीर अनिल शिंदे याचा मृत्यू झाला.तर त्याच्यासोबत असलेले दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.विशेष म्हणजे,वीरने कालच आपला वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदात साजरा केला होता.

नक्की वाचा >> Maharashtra Rain : पाच-सहा दिवस वाट बघा..सलग 9 दिवस महाराष्ट्रात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा मोठा अलर्ट

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि..

वाढदिवसानंतर अवघ्या काही तासांतच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ही बातमी समजताच अवसरी खुर्द आणि परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान,या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण काय,याचा तपास सुरू आहे.