Ambarnath CCTV Video Viral : अंबरनाथमध्ये एक भयंकर घटना घडल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा रस्ता क्रॉस करताना एका दुचाकी चालकासोबत वाद झाला. दुचाकी चालकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ सुरू केली. विद्यार्थ्याने जाब विचारल्याने दुचाकी चालकाने त्याला फरफट नेले. प्रचित दुबे असं या विद्यार्थ्याचां नाव असून तो या घटनेत जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस पुढील तपास करत आहेत.
भर दुपारी घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
भर दुपारी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी चालकाने एका कॉलेज तरुणाला काही अंतरापर्यंत फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली.