जाहिरात

Badlapur News: बदलापूर शहरातील विकासकामे ठप्प, ठेकेदारांचं कामबंद आंदोलन, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे म्हणाल्या..

बदलापूर नगरपालिकेतील ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने बदलापूर शहरातील विकास कामे ठप्प झाली आहेत.

Badlapur News: बदलापूर शहरातील विकासकामे ठप्प, ठेकेदारांचं कामबंद आंदोलन, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे म्हणाल्या..
Badlapur Municipal Corporation News
मुंबई:

Badlapur Municipal Corporation News Today : बदलापूर नगरपालिकेतील ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने बदलापूर शहरातील विकास कामे ठप्प झाली आहेत. मार्च महिन्याअखेर निघणारी विकासकामांची बिले एप्रिल महिना सुरू झाल्यानंतरही निघाली नसल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. पालिका प्रशासन बिल अदा करत नसल्याने नवीन विकासकामे करण्यासाठी पैसेच नाहीत, असं ठेकेदारांच म्हणणं आहे. त्यामुळे पैशाअभावी ठेकेदारांनी शहरातील सुरू असलेली नवीन विकास कामे बंद केली आहेत. 

...अन्यथा ठेकेदारांवर उपासमारीची वेळ 

पालिका प्रशासनाने लवकरात लवकर बिल अदा करावेत,अन्यथा ठेकेदारांवर उपासमरीची वेळ येईल,अशी माहिती ठेकेदार भरत नवघिरे यांनी दिली आहे.अशातच बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की वाचा >> Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं टेन्शन वाढलं, पोलिसांनी पुण्याच्या पत्त्यावर धाडली 'ही' नोटीस

नगराध्यक्षा रुचिता घोरपडे नेमकं काय म्हणाल्या?

या प्रकरणात बदलापूर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी म्हटलंय की, "पाच वर्ष प्रशासकीय राजवट होती नक्की कोणती कामे झाली आहेत,याची माहिती आम्हाला पण हवी.आम्ही सर्वांचे बिल देणार. याआधी देखील बिलं दिली आहेत. कंत्राटदारांनी त्यांची बिले आमच्या समोर सादर करावी.आम्ही त्यांना बिल देणार".

नक्की वाचा >> Hingoli News: आईने दिली पोटच्या पोराला संपवण्याची सुपारी, पोलीस तपासात हत्येमागचं संतापजनक कारण आलं समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com