BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीत 10 नवीन उमेदवारांना संधी

BJP First List : भाजपने 10 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

भाजपने विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये भाजपने 10 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाचा समावेश आहे.

भाजपने मराठवाड्यातील 16 उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. भाजपने पहिल्या यादीत काही विद्यमान आमदारांना देखील वगळले आहे. 

(नक्की वाचा-  BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)

भाजपच्या यादीतील नवीन उमेदवार 

  1. प्रतिभा पाचपुते - श्रीगोंदा 
  2. विनोद शेलार - मालाड पश्चिम 
  3. राजेश बकाने - देवळी (गेल्यावेळी अपक्ष) 
  4. श्रीजया चव्हाण - भोकर 
  5. शंकर जगताप - चिंचवड 
  6. विनोद अग्रवाल - गोंदिया (गेल्यावेळी अपक्ष)
  7. अनुराधा चव्हाण - फुलंबरी (हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी नियुक्ती)
  8. सुलभा गायकवाड - कल्याण पूर्व (आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी)
  9. राहुल आवाडे - इचलकरंजी 
  10. अमोल जावळे (हरिभाऊ जावळे यांचे पुत्र) - रावेर

विद्यमान आमदार वेटिंगवर

मुंबईतील भारती लव्हेकर (वर्सोवा), सुनील राणे (बोरिवली), पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांना पहिल्या यादीत संधी मिळालेली नाही.  तर देवयानी फरांदेड (नाशिक मध्य), दादासाहेब केचे, राम सातपुते (माळशिरस) यांची देखील नावे पहिल्या यादीत नाहीत. 

Advertisement

(नक्की वाचा-  BJP First List : मराठवाड्यात भाजपचे 16 उमेदवार घोषित, एक जागा मात्र वेटिंगवर)

भाजप उमेदवारांची नावे

  1. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस 
  2. कामठी - चंद्रशेखर बावनकुळे 
  3. शहादा - राजेश पाडवी 
  4. नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित 
  5. धुळे शहर-अनूप अग्रवाल 
  6. सिंदखेडा- जयकुमार रावल 
  7. शिरपूर- काशिराव पावरा
  8. रावेर - अमोल जावळे
  9. भुसावळ- संजय सावकारे
  10. जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
  11. चाळीसगाव- मंगेश चव्हाण
  12. जामनेर- गिरीश महाजन
  13. चिखली- श्वेता महाले
  14. खामगाव- आकाश फुंडकर
  15. जळगाव (जामोद) - संजय कुटे
  16. अकोला पूर्व- रणधीर सावरकर
  17. धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
  18. अचलपूर- प्रविण तायडे
  19. देवळी- राजेश बकाने
  20. हिंगणघाट- समीर कुणावार
  21. वर्धा- पंकज भोयर
  22. हिंगणा- समीर मेघे
  23. नागपूर दक्षिण- मोहन मते
  24. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  25. तिरोरा- विजय रहांगडाले
  26. गोंदिया- विनोद अग्रवाल
  27. अमगाव- संजय पुरम
  28. आरमोरी- कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर - बंटी भांगडिया
  31. वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
  32. रालेगाव- अशोक उईके
  33. यवतमाळ- मदन येरावर
  34. किनवट- भीमराव केरम
  35. भोकर- श्रीजया चव्हाण
  36. नायगाव- राजेश पवार
  37. मुखेड- तुषार राठोड
  38. हिंगोली- तानाजी मुटकुले
  39. जिंतूर - मेघना बोर्डिकर
  40. परतूर- बबनराव लोणीकर
  41. बदनापूर - नारायण कुचे
  42. भोकरदन- संतोष दानवे
  43. फुलंब्री- अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  45. गंगापूर- प्रशांत बंब
  46. बगलान- दिलीप बोरसे
  47. चांदवड- राहुल अहिर
  48. नाशिक पूर्व- राहुल ढिकले
  49. नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  50. नालासोपारा- राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
  52. मुरबाड- किसन कथोरे
  53. कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  55.  ठाणे- संजय केळकर
  56. ऐरोली- गणेश नाईक
  57. बेलापूर- मंदा म्हात्रे
  58. दहिसर - मनिषा चौधरी
  59. मुलुंड- मिहीर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  61. चारकोप - योगेश सागर
  62. मालाड पश्चिम- विनोद शेलार
  63. गोरेगाव- विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम- अमित साटम
  65. विलेपार्ले- पराग अळवणी
  66. घाटकोपर पश्चिम- राम कदम
  67. वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
  68. सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वन
  69. वडाळा- कालीदास कोळंबकर
  70. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा- राहुल नार्वेकर
  72. पनवेल- प्रशांत ठाकूर
  73. उरण - महेश बालदी
  74. दौंड - राहुल कुल
  75. चिंचवड - शंकर जगताप
  76. भोसरी - महेश लांडगे
  77. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
  78. कोथरुड - चंद्रकांत पाटील
  79. पर्वती- माधुरी मिसाळ
  80. शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगाव- मोनिका राजळे
  82. राहुरी- शिवाजीराव कर्डिले
  83. श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
  84. कर्जत जामखेड- राम शिंदे
  85. केज- नमिता मुदंडा
  86. निलंगा- संभाजी निलंगेकर
  87. औसा- अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
  92. माण- जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण- अतुल भोसले
  94. सातारा- शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली- नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
  97. इचलकरंजी- राहुल आवाडे
  98. मीरज- सुरेश खाडे
  99. सांगली- सुधीर गाडगीळ

Topics mentioned in this article