जाहिरात

Jalna News: मदरशाच्या नावाखाली सर्वात भयंकर प्रकार, पोलिसांनी 13 अल्पवयीन मुलांची केली सुटका, नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलांना शिक्षणाच्या नावाखाली मदरशात आणून त्या लहान मुलांच्या नावाचा वापर करुन देणगी गोळा केल्याचा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे.

Jalna News: मदरशाच्या नावाखाली सर्वात भयंकर प्रकार, पोलिसांनी 13 अल्पवयीन मुलांची केली सुटका, नेमकं काय घडलं?
Jalna Madrasas Crime News

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Jalna Crime News Update : अल्पवयीन मुलांना शिक्षणाच्या नावाखाली मदरशात आणून त्या लहान मुलांच्या नावाचा वापर करुन देणगी गोळा केल्याचा मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सय्यद जमील जामीनिया यांनी जालना शहरातील कबाडी मोहल्ला परिसरातील एका व्यक्तीविरोधात सादर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली.त्यानंतर पोलिसांनी तातडीनं मदरशा चालक राउफ अन्सारीची चौकशी केली. 

मुलांची बाल सुधारगृहात केली रवानगी

त्यानंतर पोलिसांनी मदरशामध्ये असलेल्या 13 अल्पवयीन मुलांची सुटका केली आणि त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली.सय्यद जमील जामीनिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मदरशा चालक राउफ अन्सारी हा बिहार राज्यातील रहिवाशी असून मुलांच्या नावाखाली लाखो रुपयांच्या देणग्या गोळा करून गैरव्यवहार करतो.अन्सारी पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथून मुलांना महाराष्ट्रात आणतो, असंही तक्रारीत म्हटलंय. 

नक्की वाचा >> Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्वीस्ट, पत्नी कल्पना खरातबाबत खळबळजनक माहिती समोर

मुलांच्या धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली पैसै गोळा केला अन्..

जालना,छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यातून मुलांच्या धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली निधी गोळा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने पावत्या देत बेकायदेशीरपणे पैसे गोळा करायचा. दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करत मदरशा चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भरती यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Navi Mumbai: बाहेरून दिसत होतं भंगारचं दुकान, आतमध्ये सुरू होता भलताच प्रकार, सर्वच जण हादरले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com