जाहिरात

महायुतीला निवडणुकीदरम्यान मोठा धक्का, डॉ. हिना गाविता यांचा भाजपला रामराम

Nandurbar Politics : बंडखोरीमुळे पक्षाचे प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत.

महायुतीला निवडणुकीदरम्यान मोठा धक्का, डॉ. हिना गाविता यांचा भाजपला रामराम

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हिना गावित यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी खासदार तसेच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाला रामराम ठोकला आहे. प्राथमिक सदस्य पदासह पक्षाच्या इतर पदांचाही त्यांनी राजीनामा पाठवला आहे. 

(नक्की वाचा-   "प्रवक्ते पद गेलं तरी चालेल...", कराळे मास्तरांनी घेतली आपल्याच पक्षाची 'शाळा')

बंडखोरीमुळे पक्षाचे प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. विजयकुमार गावित नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. तर अक्कलकुवा  मतदारसंघातून हिना गावित महायुतीच्या विरोधातच निवडणूक लढवत आहेत. 

(नक्की वाचा- "...तर महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही", फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे काय म्हणाले?)

कशी असेल लढत?

जिल्ह्यातील सर्वात मोठे बंडखोरी असून येथे हायव्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात बंड केल्याने हिना गावित यांनी शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी आणि काँग्रेसच्या अॅड. के. सी. पाडवी यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: