विधानसभेत भाजपच्या 'या' आमदारांचं तिकीट कापलं जाणार?, दिल्लीहून काय आदेश आला?

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. भाजपच्या काही विद्यमान आमदारांविषयी नाराजी असल्यास, नवीन उमेदवार चेहरा द्यायचा निर्णय झाला आहे.

Advertisement
Read Time: 1 min

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी मागे ठेवत भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसली आहे. राज्यातील मतदारसंघांचा भाजपकडून आढावा घेतला जात आहे. भाजपकडून विधानसभा मतदारसंघांचे सर्व्हे करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांना डावललं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात नाराजी असणाऱ्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. भाजपच्या काही विद्यमान आमदारांविषयी नाराजी असल्यास, नवीन उमेदवार चेहरा द्यायचा निर्णय झाला आहे.  जास्त वेळा विजयी झालेले उमेदवार किंवा पहिल्या टर्ममधील आमदार ज्यांच्या विषयी नाराजी असल्यास त्यांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची सूचना दिल्लीकडून मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

येत्या 17 ऑगस्टपासून महाराष्ट्र भाजप प्रभारी भुपेंद्र यादव राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय ते दौरा सुरू करणार आहेत. प्रत्येक जिल्हात राजकीय परिस्थितीचा आढावा भुपेंद्र  यादव घेणार आहेत. 
 

Advertisement