PM नरेंद्र मोदींना चॅलेंज देण्याची तुमची औकात नाही, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देऊन, भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, भाजप आणि संघ त्यांच्यासोबत आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

Advertisement
Read Time: 2 mins

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज देण्याची तुमची औकात आणि लायकी नाही. वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देऊन, भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, भाजप आणि संघ त्यांच्यासोबत आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

नारायण राणे यांची एक्स पोस्ट

उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदीजी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उद्गारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव ठाकरे वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देऊन भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. 

(नक्की वाचा- 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील')

आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला. तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही, असंही नारायण राणे यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा- इंदापुरात शरद पवारांचा अजित पवारांना धक्का; विधानसभेत राजकीय गणितं बदलणार)

भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वःताचे कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप व आरएसएस त्यांच्यासोबत आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article