जाहिरात

Latur News: शहराच्या विकासाची चर्चा शॉपिंग कॉम्पेक्समध्ये होणार? अहमदपूर नगरपरिषद चर्चेत का?

'शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांमध्ये बसून नगरसेवक शहराच्या विकासाची चर्चा करणार का?' असा संतप्त सवाल आता नागरिकांनी विचारला आहे, ज्यामुळे प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले जात आहे.

Latur News: शहराच्या विकासाची चर्चा शॉपिंग कॉम्पेक्समध्ये होणार? अहमदपूर नगरपरिषद चर्चेत का?

 त्रिशरण मोहगावकर, लातूर

अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून, प्रशासनासह सर्वच पक्षांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. महिन्याभरात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन नगरसेवक सभागृहात जातील. मात्र, निवडून आलेले हे नगरसेवक नेमके कुठे बसून शहराच्या विकासाची चर्चा करणार, असा गंभीर सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

याचे कारण म्हणजे अहमदपूर नगर परिषदेच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी, नगर परिषदेचा संपूर्ण कारभार सध्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधून चालवला जात आहे. प्रत्येक विभागासाठी कॉम्प्लेक्समध्ये वेगळे शटर (गाळा) देण्यात आले आहे. 'शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांमध्ये बसून नगरसेवक शहराच्या विकासाची चर्चा करणार का?' असा संतप्त सवाल आता नागरिकांनी विचारला आहे, ज्यामुळे प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले जात आहे.

(नक्की वाचा- Jemimah Rodrigues: जेमिमाह रॉड्रिग्सने वांद्रे सोडून नवी मुंबईत घेतलं नवीन घर, कारण वाचून अभिमान वाटेल!)

उमेदवारीसाठी इच्छुकांत काँटे की टक्कर

दुसरीकडे, अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा दिसून येत आहे, ज्यामुळे निवडणुकीत काँटे की टक्कर होणार असल्याची चर्चा आहे. माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. माजी नगर अध्यक्ष शिवराज चौधरी यांचे चिरंजीव शेखर चौधरी, माजी आमदार निवृत्तीराव रेड्डी यांचे नातू वैभव रेड्डी, तसेच त्यांच्याच परिवारातून माजी नगरसेवक अमित रेड्डी यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.

काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष कलीमोद्दीन अहमद आणि विकास महाजन यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) राहुल शिवपुजे, सय्यद साजीद आणि विजय शेट्टे हे इच्छुकांच्या यादीत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी उपनगराध्यक्ष अभय मिरकले, शेखर चौधरी, रहीम पठाण आणि सय्यद इसुब अशा चार दिग्गजांनी उमेदवारी मागितली आहे.

(नक्की वाचा-  मनसोक्त क्रिकेट खेळला, पाणी प्यायला अन् जमिनीवर कोसळला; LIC अधिकाऱ्यांचा जागेवरच मृत्यू)

एकंदरीत, निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठीच अहमदपुरात मोठी स्पर्धा लागली असून, विविध पक्षांतील दिग्गजांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यामुळे येणारी नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com