यशपाल सोनकांबळे, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर, राजकीय पक्षांनी आपल्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांना ही पदे मिळाली आहेत.
महापालिकेत ज्या पक्षाचे जितके जास्त निवडून आलेले प्रतिनिधी असतात, त्या प्रमाणात त्या पक्षाला स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याचा अधिकार मिळतो. यंदाच्या या निवडीमध्ये भाजपने आपले वर्चस्व राखत 7 जागांवर नावे निश्चित केली आहेत.
भाजपचे स्वीकृत नगरसेवक
- निलेश कोंढाळकर
- प्रियंका शेंडगे
- विश्वास नानावरे
- राजेंद्र काकडे
- रवी साळेगावकर
- जयप्रकाश पुरोहित
- उदय लेले
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचे माजी महापौर आणि अनुभवी नेत्यांना संधी दिली आहे.
- दत्तात्रय धनकवडे (माजी महापौर)
- राकेश कामठे
काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर सुनील शिंदे या आपल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची निवड केली आहे.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
स्वीकृत नगरसेवकांचे महत्त्व
स्वीकृत नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून येत नाहीत, तरीही त्यांना महापालिकेच्या कारभारात निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच अधिकार असतात. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ किंवा अनुभवी राजकीय कार्यकर्त्यांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी ही तरतूद केली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world