BJP Ravindra Chavan : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रवींद्र चव्हाण यांची पुढील काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा- Walmik Karad : "पोते भरुन पैसा, 140 जणांकडून कोट्यवधी हडपले", वाल्मिक कराडचा नवा कारनामा उघड)
रवींद्र चव्हाण यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये असताना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपद डावलल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत होती.
रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगसेवक ते भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष असा रवींद्र चव्हाण यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. रविंद्र चव्हाण 2005 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2007 साली त्यांची महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्या विधानसभेत पोहोचले.
AAP MLA Death: खळबळजनक! आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात? कुटुंबियाचा मोठा दावा
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत 2014, 2019, 2024 असा विजयी चौकार लगावला. 2016 साली त्यांना राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्रिपदे भूषवली. त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.