BMC Officers Transfer: अश्विनी भिडे ॲक्शन मोडवर! 15 दिवसांत सहाय्यक आयुक्तांसह 4 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारताच 15 दिवसांच्या आत पालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये उपायुक्त, सहआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. अवघ्या 15 दिवसांमध्ये भिडे यांनी पालिकेतील उपायुक्त, सहआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यापूर्वी तत्कालीन आयुक्तांनी 4 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र अश्विनी भिडे यांच्या नव्या आदेशांमुळे पालिकेत मोठ्या फेरबदलांचे वारे वाहत आहेत.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली नियुक्ती? 

  1. अलका ससाणे: बाजार विभागातील सहाय्यक आयुक्त पदावरून त्यांची 'सी' विभागात अतिरिक्त कार्यभार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. योगेश देसाई: 'बी' विभागातील सहाय्यक आयुक्त पदावरून त्यांची 'डी' विभागात बदली करण्यात आली आहे.
  3. संतोष साळुंखे: 'सी' विभागाचे सहाय्यक आयुक्त आता 'डी' विभागाचा पदभार सांभाळतील. सोबतच त्यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन (शहर) विभागाचा अतिरिक्त पदभारही सोपवण्यात आला आहे.
  4. जितेंद्र घोराडे: उपप्रमुख अभियंता संवर्गातील जितेंद्र घोराडे यांची 'बी' विभागात पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(नक्की वाचा- Vande Bharat Train: मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरचा मार्ग बदलणार? सांगली-मिरजकरांचा संताप; थेट PMO कडे धाव)

नव्या नियुक्त्यांचे महत्त्व

पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील नालेसफाई, अतिक्रमण निर्मूलन आणि रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हे फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः 'डी' विभागासारख्या हाय-प्रोफाईल भागात अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

अश्विनी भिडे यांची रणनीती

अश्विनी भिडे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता आणण्यावर भर दिला आहे. 15 दिवसांच्या आत केलेल्या या बदल्यांमधून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, कामात कसूर करणाऱ्या किंवा दीर्घकाळ एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी नवीन आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना संधी दिली जाईल.

Topics mentioned in this article