BMC Election: बीएमसी निवडणुकीसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन'! योगी आदित्यनाथ, पवन कल्याण यांच्यासह मोठी फौज सज्ज?

Mumbai Municiple Corporation Election 2026: मुंबईत उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्या निर्णायक आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावरील बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याचा प्लॅन आखला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Mahapalika Election 2026:  देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी आता राजकीय वातावरण तयार होऊ लागले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही महायुती एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या निवडणुकीत मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने अतिशय मायक्रो लेव्हल नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध भाषिकांच्या मतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार प्रचारकांची मोठी फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टार प्रचारकांचा धडाका

मुंबईत उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्या निर्णायक आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावरील बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याचा प्लॅन आखला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात हे दिग्गज नेते मुंबईच्या विविध भागात रोड शो आणि जाहीर सभा घेणार आहेत.

(नक्की वाचा-  Baramati Elections: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, समोर नोटांचा ढीग अन्... VIRAL व्हिडिओने बारामतीचे राजकारण तापलं)

कोणते नेते सहभागी होऊ शकतात?

  • योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असून उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे.
  • पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य मतदारांमध्ये कमालीची लोकप्रियता असलेले नेते आहेत.
  • हेमंत बिस्वा सरमा हे आसामचे मुख्यमंत्री असून हिंदुत्ववादी नेते म्हणून देखील ओळखले जातात.
  • याशिवाय मोहन यादव (मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री), ज्योतिरादित्य सिंधिया (केंद्रीय मंत्री) हे देखील प्रचारात सहभागी होऊ शकतात.

महायुतीचं जागावाटप

महायुतीच्या जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत दोन मोठ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा कोअर कमिटी बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीला आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि मंगलप्रभात लोढा यांसारखे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजपच्या बैठकीनंतर महायुतीची दुसरी बैठक 'वसंत स्मृती' कार्यालयात पार पडणार आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

रणनीती प्रत्येक मतावर लक्ष

भाजपने केवळ मोठ्या सभांवर भर न देता, प्रत्येक वॉर्डमधील मतदारांच्या रचनेनुसार प्रचार करण्याची योजना आखली आहे. कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या भाषिक मतदारांचे प्राबल्य आहे, त्यानुसार त्या राज्यातील स्टार प्रचारकाला तिथे पाठवले जाणार आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणे हे महायुतीसाठी प्रतिष्ठेचे असून, भाजप यावेळेस कोणतीही कसर सोडण्यास तयार नाही.

Topics mentioned in this article