BMC Election 2026: दुबार मतदार असाल तरी करता येईल मतदान; या गोष्टी कराव्या लागतील

BMC Election 2026: ज्या मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागात किंवा एकाच प्रभागातील दोन वेगवेगळ्या केंद्रांवर आहेत, त्यांना 'दुबार मतदार' म्हटले जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत असून, यंदा 'दुबार मतदार' असलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाने विशेष नियम लागू केले आहेत. जर मतदार यादीत तुमच्या नावापुढे 2 स्टार (*)* असतील, तर तुम्हाला मतदान केंद्रावर एक नाही तर दोन ओळखपत्रे सादर करावी लागणार आहेत. सुमारे 1 लाख 68 हजार मतदार* हे 'दुबार' असल्याचे मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. अशा मतदारांकडून गैरप्रकार टाळण्यासाठी पालिकेने कडक पावले उचलली आहेत.

'दुबार' मतदार म्हणजे काय?

ज्या मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागात किंवा एकाच प्रभागातील दोन वेगवेगळ्या केंद्रांवर आहेत, त्यांना 'दुबार मतदार' म्हटले जाते. पालिका कर्मचाऱ्यांनी 1.26 लाख घरांना प्रत्यक्ष भेट देऊन याची पडताळणी केली आहे.

(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)

नावापुढे 2 स्टार असल्यास काय करावे?

ज्या मतदारांच्या नावापुढे 2 स्टार आहेत, त्यांनी मतदान केंद्रावर जाताना खालील गोष्टी पाळाव्यात,

  • दोन ओळखपत्रे- निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पुराव्यांपैकी कोणतेही दोन मूळ पुरावे सोबत ठेवावेत.
  • हमीपत्र (अर्ज ब) - आपण केवळ एकाच केंद्रावर मतदान करणार आहोत, असे लेखी हमीपत्र (फॉर्म ब) केंद्रावर भरून देणे अनिवार्य आहे.
  • फॉर्म अ पडताळणी- ज्या 48,328 मतदारांनी आधीच 'फॉर्म अ' भरला आहे, त्यांनी निवडलेल्या केंद्रावरच मतदान करणे अपेक्षित आहे.

कोणते पुरावे ग्राह्य धरले जातील?

  1. पासपोर्ट
  2. आधार कार्ड
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. पॅन कार्ड
  5. सरकारी/सार्वजनिक उपक्रम ओळखपत्र (फोटोसह)
  6. बँक/पोस्ट ऑफिस पासबूक (फोटोसह)
  7. दिव्यांग दाखला (युडीआयडी कार्ड)
  8. मनरेगा जॉब कार्ड (फोटोसह)
  9. निवृत्ती वेतन कागदपत्रे (फोटोसह पासबूक/प्रमाणपत्र)
  10. लोकसभा/राज्यसभा/विधानसभा सचिवालयाचे ओळखपत्र
  11. कामगार मंत्रालयाने जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड
  12. निवडणूक आयोगाने दिलेले अधिकृत ओळखपत्र (Voter ID)