Raj-Uddhav Thackeray Interview: राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, त्यातही मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर सर्वांचं लक्ष आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, ती ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वाची आणि महायुतीच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिलीच संयुक्त मुलाखत पार पडणार आहे. मुंबईवर कोणाची सत्ता येणार? महापौर मराठी माणूस असणार की फक्त हिंदू? अशा प्रश्नाची उत्तरे या मुलाखतीत मुंबईकरांना मिळतील.
मुलाखतीची वेळ
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर ठाकरे बंधुंची मुलाखत घेणार आहेत. ही मुलाखत 8 जानेवारी आणि 9 जानेवारी रोजी 'दैनिक सामना'च्या अंकात सविस्तरपणे प्रसिद्ध केली जाईल. ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र मुलाखत देत असल्याने राजकीय वर्तुळात या मुलाखतीची मोठी उत्सुकता आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
मुलाखतीचे प्रमुख मुद्दे
या मुलाखतीत ठाकरे बंधू मुंबईच्या भविष्याबाबत आणि त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत अनेक मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. मुंबईवर कोणाची सत्ता येणार? महापौर मराठी माणूस असणार की फक्त हिंदू? या वादावर दोन्ही नेते आपली भूमिका स्पष्ट करतील.
(नक्की वाचा- "मुख्यमंत्र्यांनी माझी कदर केली", संतोष धुरींचा प्रतिक्रिया; संदीप देशपांडेंसोबतच्या मैत्रीबाबत म्हणाले...)
महायुतीला रोखण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा निर्णय का घेतला, यावर देखील मुलाखतीत प्रकाश टाकला जाऊ शकतो. 4 जानेवारी रोजी त्यांनी 'शब्द ठाकरेंचा' हा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला आहे, त्यातील आश्वासनांवरही या मुलाखतीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world