जाहिरात

"मुख्यमंत्र्यांनी माझी कदर केली", संतोष धुरींची प्रतिक्रिया; संदीप देशपांडेंसोबतच्या मैत्रीबाबत म्हणाले...

BMC Elelction 2026: संतोष धुरी यांना नारीजबद्दल विचारले असता, बीएमसी निवडणुकीत तिकीट न मिळाल्याा विषय नाही. मी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते चुकीचं होतं. मला थोडा वेळ द्या, मी आज दुपारी माझी अंतिम राजकीय भूमिका स्पष्ट करेन.

"मुख्यमंत्र्यांनी माझी कदर केली", संतोष धुरींची प्रतिक्रिया; संदीप देशपांडेंसोबतच्या मैत्रीबाबत म्हणाले...

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-ठाकरे गटाच्या युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेचे नेते आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी 5 जानेवारी रोजी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

नितेश राणेंची मध्यस्थी आणि मुख्यमंत्र्यांची भेट

संतोष धुरी यांनी सांगितले की, मंत्री नितेश राणे यांनी केवळ त्यांच्या भेटीसाठी सिंधुदुर्गातून खास मुंबई गाठली. "नितेश राणे यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि साहेबांची भेट घेऊया असं सुचवलं. देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने प्रतिसाद देत मला बंगल्यावर बोलावलं. त्यांच्याशी अर्धा तास सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी माझी कदर केली, याचे समाधान आहे," अशी प्रतिक्रिया धुरी यांनी दिली आहे.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

संतोष धुरी यांना नारीजबद्दल विचारले असता, बीएमसी निवडणुकीत तिकीट न मिळाल्याचा विषय नाही. मी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते चुकीचं होतं. मला थोडा वेळ द्या, मी आज दुपारी माझी अंतिम राजकीय भूमिका स्पष्ट करेन.

(नक्की वाचा- बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, नागरिकांच्या जीवाशी खेळ; रिक्षाचालक तरूणाचा VIDEO बघाच)

संदीप देशपांडेंसोबतच्या मैत्रीचं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेकडून कुणी संपर्क साधला का? यावर त्यांनी म्हटलं की, राज ठाकरे, संदीप देशपांडे किंवा कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. तर संदीप देशपांडे यांच्यासोबतच्या मैत्रीवर त्यांनी म्हटलं की, त्यांनी मैत्री ठेवली तर त्यांच्याशी मैत्री कायम राहील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com