जाहिरात

VIDEO : चेंबूरमध्ये बनावट अधिकारी अन् पैसे वाटपावरून राडा; ठाकरे गट आक्रमक, उमेदवारही भावुक

BMC Election 2026: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवाराने खालील धक्कादायक आरोप केले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

VIDEO : चेंबूरमध्ये बनावट अधिकारी अन् पैसे वाटपावरून राडा;  ठाकरे गट आक्रमक, उमेदवारही भावुक

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना चेंबूरमधील घाटले परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (UBT) गटाने केला असून, यावेळी मतदान केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे ठाकरे गटाचे उमेदवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

काय आहेत नेमके आरोप?

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवाराने खालील धक्कादायक आरोप केले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी असल्याचे सांगून दोन व्यक्ती थेट मतदान बूथमध्ये घुसल्या. त्यातील एक व्यक्ती IT तज्ज्ञ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तींकडे असलेली ओळखपत्रे (ID Cards) बनावट असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने त्यांना घेराव घातला.

पाहा VIDEO

आम्ही निवडणूक लढवत नाही, त्यांनाच विजयी करा

हा सर्व प्रकार पाहून ठाकरे गटाचे उमेदवार अत्यंत संतप्त झाले आणि त्यांचा संयम सुटला. यावेळी ते भावुक देखूल झाले होते. "जर अशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी केंद्रात घुसणार असतील आणि उघडपणे पैसे वाटले जाणार असतील, तर ही कसली लोकशाही? आम्ही निवडणूक लढवत नाही, त्यांनाच थेट बिनविरोध विजयी घोषित करा," अशा शब्दांत उमेदवाराने आपली हतबलता व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. संशयित दोन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे आयडी कार्ड खरे आहेत की बनावट, याची तपासणी निवडणूक आयोगाचे अधिकारी करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com