BMC Election : नवं राजकीय समीकरण? मनसे-शिवसेना युतीबाबत हालचालींना वेग, पडद्यामागे काय घडतंय? 

एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी मनसेला सोबत घेतल्यास सुमारे 100 पेक्षा जास्त जागा मनसेला द्यावा का याचा विचार शिवसेनेत काही मोठ्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Raj Thackeray Eknath Shinde

Mumbai Political News: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मनसेसोबत युती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. शिवसेनेने मनसेला मुंबई महानगरपालिकेत 100 पेक्षा जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसे आणि शिवसेना यांच्यात जागावाटप कसं करायचं याच्या चर्चा देखील सुरु झाल्याची माहिती आहे. मनसेने जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायची तयारी  सुरु केली आहे. युती होत असेल तर मनसेला 50 टक्के जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

(नक्की वाचा-  Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? सर्व राजकीय चर्चांना अजित पवारांनी दिलं उत्तर)

शिवेसना भाजपसोबत युती व्हावी यासाठी आग्रही आहे. मात्र युती झाली नाही, भाजप जर मुंबई मनपा निवडणूक स्वबळावर लढवत असेल तर मात्र पर्याय म्हणून शिवसेना शिंदे हे मनसेसोबत युतीचा पर्याय ठेवत आहे. मनसेसोबत युती करण्याच्या दृष्टीने जागावाटपाच्या हालचाली देखील सुरू केल्याची माहिती आहे. 

एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी मनसेला सोबत घेतल्यास सुमारे 100 पेक्षा जास्त जागा मनसेला द्याव्या का याचा विचार शिवसेनेत काही मोठ्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे. शिवसेना 227 जागांपैकी मनसेला 100 च्या आसपास जागा द्यायच्या तयारीत आहे.  तसेच निवडणुकीसाठी लागणाऱ्या  इतर सामग्रीतही सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याचं समजतंय. 

Advertisement

( नक्की वाचा : Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ? )

मनसे आणि शिवसेना यांच्यात याबाबत चर्चा प्राथमिक स्तरावर सुरु आहे पुढील काही दिवसात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे.मनसे शिवेसनेच्या प्रस्तावावर तुर्तास फार सहमत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेला युती करायची असेल तर किमान 50 टक्के जागा हव्यात आहे. यावरून अद्याप शिवसेना-मनसेत तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे

Topics mentioned in this article