
BOB Bank of Baroda LBO Recruitment 2025: राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदानं (BOB) ने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार आज, 4 जुलै ते 24 जुलै 2025 पर्यंत bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
BOB Bank of Baroda LBO Recruitment 2025: नोटिफिकेशन
BOB Bank of Baroda LBO Recruitment 2025: डायरेक्ट लिंक
BOB LBO Recruitment 2025: रिक्त पदं
या भरती मोहिमेचा उद्देश LBO च्या एकूण 2500 पदांची भरती करणे आहे.
BOB LBO Recruitment 2025: वयोमर्यादा
बँक ऑफ बडोदा एलबीओ भरतीसाठी अर्जदाराचे वय 1 जुलै 2025 पर्यंत 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी वरच्या वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
(नक्की वाचा: SBI PO Notification 2025 : SBI मध्ये अधिकारी बनण्याची संधी; 541 जागांसाठी मेगा भरती, कुठे कराल अर्ज? )
BOB LBO Recruitment 2025: आवश्यक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवीधर असावा. ज्यात इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) देखील समाविष्ट आहे. चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.
अर्जदाराकडे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिसूचना पहा.
BOB LBO Recruitment 2025: : अर्ज शुल्क
या नोकरीसाठी सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील अर्जदारांना रु 850/- शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, PwD, ESM आणि महिला उमेदवारांसाठी रु 175/- शुल्क लागू होईल. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
बँक ऑफ बडोदा एलबीओ भरती 2025 साठी अर्ज कसा करावा? (How to Apply for Bank of Baroda LBO Recruitment 2025?)
- अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
- उपलब्ध बँक ऑफ बडोदा LBO नोंदणी 2025 लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी पूर्ण करा आणि नंतर लॉगिन करा.
- संपूर्ण अर्ज भरा.
- कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world