जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: आरोग्य विभागात बोगस नियुक्तीचे प्रकार? बनावट नियुक्ती पत्रामुळे खळबळ

Chhatrapati Sambhajinagar : घाटी न्यू रुग्णालयातील नर्स नियुक्त्या संपल्या होत्या. त्यामुळे शासनाने हे पत्र दिलं कसं असा प्रश्न घाटी रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. 

Chhatrapati Sambhajinagar: आरोग्य विभागात बोगस नियुक्तीचे प्रकार? बनावट नियुक्ती पत्रामुळे खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: आरोग्य विभागात बोगस नियुक्तीचे प्रकार सुरू आहेत की काय असा प्रश्न संभाजीनगरच्या एका घटनेवरून पुढे येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालय म्हणजेच  घाटी रुग्णालयात एक युवक नर्स म्हणून नियुक्तीसाठी शासकीय पत्र घेऊन आला होता.  महत्त्वाचं म्हणजे घाटी न्यू रुग्णालयातील नर्स नियुक्त्या संपल्या होत्या. त्यामुळे शासनाने हे पत्र दिलं कसं असा प्रश्न घाटी रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तरुणाकडील या पत्राची पडताळणी सुरू केली त्यावेळी या युवकासोबत अजूनही तीन जण असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. शासनाच्या या पत्राची पडताळणी सुरू असतानाच या युवकाला संशय आला आणि त्याने त्याच्या 3 साथीदारांसह  तिथून पळ काढला. त्यानंतर घाटी रुग्णालयाने हे पत्र तपासले असता हे बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.  

(नक्की वाचा-  Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक)

महत्त्वाचं म्हणजे त्या युवकासोबत जी तीन मुलं होती, त्यांच्याजवळही असेच प्रमाणपत्र होते असा संशय रुग्णालयाला आहे. त्यामुळे नक्की ही बनावट प्रमाणपत्र कुठून मिळतात असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.  

(नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके)

अगदी हुबेहूब शासकीय नेमणूक पत्रासारखं हे बनावट पत्र होतं.  याबाबत आता घाटी रुग्णालयाने चौकशी सुरू केली आहे. राज्य सरकारलाही कळवण्यात आले आहे. गरज पडल्यास याबाबत पोलिसात तक्रार सुद्धा दिली जाणार असल्याचं घाटी रुग्णालयाचे अधिष्ठातांनी सांगितलं आहे. दरम्यान पैसे घेऊन अशा पद्धतीचे बनावट प्रमाणपत्र बनत असल्याचं याआधीही पुढं आलं होतं, त्यातलाच तर हा प्रकार आहे का याची चौकशी करण्याची गरज आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com