जाहिरात

Borivali to Nashik Bus Ticket : Good News! आता समृद्धीवरुन सुसाट, मुंबई-नाशिक प्रवासात मोठा बदल

मुंबई ते नाशिकपर्यंतचा प्रवास कसारामार्गापेक्षा समृद्धीवरुन अधिक सुसाट होतो.

Borivali to Nashik Bus Ticket : Good News! आता समृद्धीवरुन सुसाट, मुंबई-नाशिक प्रवासात मोठा बदल

Borivali to Nashik bus ticket : मुंबई ते नाशिकपर्यंतचा प्रवास कसारामार्गापेक्षा समृद्धीवरुन अधिक सुसाट होतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पश्चिम मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 

वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्याच्या उ‌द्देशाने, नाशिक विभागामार्फत गुरुवार ४ डिसेंबरपासून हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून नाशिक ते बोरिवली (Borivali) दरम्यान अत्याधुनिक इलेक्ट्रिक एसी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन सेवेमुळे मुंबई (बोरिवली) आणि नाशिक दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी मिळाली आहे.

पर्यावरणपूरक सेवेकडे वाटचाल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण ६५ इलेक्ट्रिक बसेस आपल्या प्रवासी सेवेत समाविष्ट केल्या आहेत. या बसेस नाशिक-बोरीवली, नाशिक-छत्रपती संभाजीनगरसह इतर प्रमुख मार्गावर सेवा देत आहेत. नाशिक-बोरीवली बस प्रवासादरम्यान ठाण्याला थांबा असेल. 

Nashik News : म्हाडाची स्वस्त घरं, 14 लाखात करा खरेदी; नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी, लोकेशन काय?

नक्की वाचा - Nashik News : म्हाडाची स्वस्त घरं, 14 लाखात करा खरेदी; नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी, लोकेशन काय?

बोरिवली-नाशिक मार्गावर नवीन फेऱ्या

प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर केला जात आहेत. नव्याने सुरु करण्यात आलेल्या नवीन फेऱ्या ०४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नाशिक बोरिवलीः ११ जाणाऱ्या आणि ११ येणाऱ्या फेऱ्या असतील. 

वेळ आण भाडं जाणून घ्या....

बोरिवली ते नाशिक 

वेळा - ५,००, ७.००, ८.००, ९.००, १०,००, ११.००, १२.३०, १३.३०, १४.३०, १५.३०, १७.००

नाशिक-बोरिवली - ६.००, ७.००, ८.००, ९.००, १०,००, १२.३०, १३.३०, १४.३०, १५.३०, १७.३०, १७.३०

पूर्ण तिकीट - ५०९ रुपये

महिला तिकीट - २६६ तिकीट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com