जाहिरात

Nashik News : म्हाडाची स्वस्त घरं, 14 लाखात करा खरेदी; नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी, लोकेशन काय?

नाशिकमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना अवघ्या १४ लाखात हक्काचं घर घेता येणार आहे.

Nashik News : म्हाडाची स्वस्त घरं, 14 लाखात करा खरेदी; नाशिकमध्ये 402 घरांसाठी लॉटरी, लोकेशन काय?

Nashik MHADA News : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिकमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना अवघ्या १४ लाखात हक्काचं घर घेता येणार आहे. स्वत:चं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र शहरांमधील घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणं शक्य होत नाही. म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे नाशिक भागातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारातील विविध गृहनिर्माण प्रकल्पामधून घरं घेता येणार आहे. यातील ४०२ घरं आगाऊ अंशदान तत्त्वावर विकण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे. 

म्हाडाची स्वस्त घरं...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घरं १४ लाख ९४ हजार ते ३६ लाख ७५ हजारापर्यंत आहेत. त्यामुळे नाशिककरांना स्वस्त दरात घरं खरेदी करता येणार आहे. २०२५ मध्ये केलेली ही चौथी लॉटरी आहे. या लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरं देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. आगाऊ अंशदानाअंतर्गत ज्या घरांची लॉटरी काढली जात आहे, ती अद्याप बांधलेली नाहीत, लोकमतने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे.

नक्की वाचा - Pune News: पुणे म्हाडाच्या 4186 सदनिकांबाबत मोठा निर्णय, सोडतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

नाशिकमध्ये कुठे आणि किती घरं?

अल्प उत्पन्न गटासाठी...

चुंचाळे शिवार - १३८
पाथर्डी शिवार - ३०
मखमलाबाद - ४८
आडगाव - ७७

अशा एकूण २९३ घरांचा या लॉटरीत समावेश आहे. 

मध्यम उत्पन्न गट 

सातपूर - ४०
पाथर्डी - ३५
आडगाव - ३४

एकूण १०९ घर

हक्काचं घर मिळविण्यासाठी अर्जदारास १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com