BSE receives bomb threat: 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'ला बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलिसांकडून तपासणी सुरू

BSE receives bomb threat:  मुंबई पोलीस दलाने इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BSE receives bomb threat:  मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इमारतीला बॉम्बची धमकी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलीस दलाने इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'कॉम्रेड पिनराई विजयन' या नावाने आलेल्या एका ईमेलमध्ये इमारतीच्या आवारात आरडीएक्स बेस्ड आयईडी पेरल्याचा दावा करण्यात आला होता. दुपारी 3 वाजता त्याचा स्फोट होणार असल्याचेही इमेलमध्ये म्हटले होते.

(नक्की वाचा- भाजपचे वाचाळवीर खासदार निशिकांत दुबेंना मनसेची नोटीस, 7 दिवसात उत्तर देण्याचा इशारा)

धमकीचा ईमेल मिळताच, मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण बीएसई इमारतीची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत, ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेनंतर एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या ईमेलच्या सोर्सचा आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा  शोध घेत आहेत.

(नक्की वाचा- Tesla India launch : टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं मुंबईत उद्घाटन, CM फडणवीसांची उपस्थिती)

बॉम्बच्या धमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने सर्व संबंधित एजन्सींना या घटनेची माहिती दिली आणि इमारतीमधील सामान्य कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याचे स्पष्ट केले. अशा धमक्या गांभीर्याने घेतल्या जातात आणि त्यांचा सखोल तपास केला जातो, असं पोलिसांनी सांगितलं.

Advertisement
Topics mentioned in this article