स्वयंपाक घरातील लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली आहे . किरकोळ बाजारात लसणाचे दर 400 रूपये किलो वर गेले आहेत. त्यामुळे घरोघरी किचनचे बजेट पुन्हा एकदा गडबडले आहे . या वर्षात लसूण 400 रु किलो वर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे लसूण खरेदी करावा की नाही असा प्रश्न सर्वाना पडत आहे. त्यात भर म्हणून की काय कोथिंबीरचाही भाव वधारला आहे. आता पर्यंतचा उच्चांकी भाव कोथिंबिरला मिळाला आहे. त्यामुळे जेवणातून आता कोथिंबीर गायब होणार अशी स्थिती आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लसणाशिवाय डाळीची ,भाजीची फोडणी पूर्ण होत नाही. त्यामुळे थोडा का होईना लसूण खरेदी करावा लागतोच. पण लसणाचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एक किलो लसूण घेणारे आत्ता मात्र पाव किलो वर समाधान मानत आहे . मागणी इतका पुरवठा होत नसल्याने, दर वाढत आहे. सध्या घाऊक बाजारात केवळ 2 किंवा 3 गाड्या लसूण बाजारात दाखल होत आहे. बाजारात सध्या मध्य प्रदेश , राजस्थान आणि गुजरातच्या लसूणाची आवक होत आहे. घाऊक बाजारात गावठी लसूण उपलब्ध आहे. मात्र वाढत्या मागणीमुळे लसूणाची कमी बाजारात जाणवत आहे . त्यामुळे लसणाचे दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - तलवार गँगची दहशत, धुमाकूळ घालतानाचा सीसीटीव्ही आला समोर
लसणाप्रमाणे कोथिंबीरचे भावही गगनाला भिडले आहेत. अचानक झालेल्या याभववाढीमुळे सर्व सामान्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कोथिंबीरला नाशिक मध्ये विक्रमी भाव मिळाला आहे. गावठी कोथिंबीर 450 रुपये जोडी या दराने मिळत आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव आहे. तर मेथीची जुडी 250 रूपयांवर गेली आहे. कोथिंबीरसह इतर भाजांच्या दरात तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खास करून पालेभाज्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. त्यांचे महिन्याचे बजेट त्यामुळे कोलमडून गेले आहे.
ट्रेंडिंग बातमी - तिच्यासाठी लढणारा 'तो', बिहार ते मुंबई चालत आला, कारण ऐकून तुम्ही ही म्हणाल...
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये रविवारी 1 सप्टेंबरला कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल 200 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला होता.तर मेथीच्या भाजीला 110 रुपये प्रति जुडी असा दर मिळाला होता. कोथिंबीरला 20 हजार रुपये शेकडा, तर मेथीचा दर 10 हजार रूपये शेकडा भाव मिळाला.आजपर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील 20 हजार रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबिरीला मिळाला आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांची कोथिंबीर व इतर शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक कमी झाली याचा परिणाम दरांवर झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world